Home Breaking News दत्तापूर धांदरवाडी येथील आत्माराम राठोड यांचा रोड एक्सीडेंट मध्ये मृत्यू:

दत्तापूर धांदरवाडी येथील आत्माराम राठोड यांचा रोड एक्सीडेंट मध्ये मृत्यू:

635

 

(तुकाराम राठोड)

प्रतिनिधी:(सिंदखेडराजा)तालुक्यातील दत्तापूर (धांदरवाडी) येथील रहिवासी आत्माराम राठोड वय ४५ वर्ष यांचा आज सकाळी ट्रक व मोटरसायकल दुर्घटने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.ही घटना माळसावरगाव घाटात घडली आहे.बेधुंद ट्रक चालकांने मोटरसायकला उडवल्याने आत्माराम राठोड यांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.आत्माराम राठोड हे दुचाकीवरून माळसावरगाव घाटातून प्रवास करीत होते.एक्सीडेंट एवढा भीषण होता की,आत्माराम राठोड यांच्या गाडीला जोरात धडक दिल्याने ते जागीच गतप्राण झाले आहे.ही घटना अतिशय दुर्देवी व मन हेलावून टाकणारी आहे.या घटनेमुळे(दत्तापूर)धांदरवाडी या गावावर व तांड्यावर शोक-कळा पसरली आहे.आत्माराम राठोड यांच्या पश्चात-पत्नी,आई-वडील, मुलगा-मुलगी असा परिवार आहे.या घटनेमुळे राठोड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ईश्वर राठोड परिवाराला या दुखातुन सावरण्याची सद्बुद्धी देवो.हि नम्र विनंती.”ओम- शांती- ओम”, “भावपूर्ण श्रद्धांजली”.

Previous articleकुरूळ येथे जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी.
Next articleधारणी नगर पंचायत अंतर्गत संपूर्ण शहरात झालेले व शुरु असलेले रोड नाली चे कामे निक्रुष्ठ