Home Breaking News अवैद्यरित्या गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपीतांना अटक..

अवैद्यरित्या गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपीतांना अटक..

330

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट दि.१७ नोव्हेबर
शहरामध्ये पेट्रोलींग करीत असता बस स्थानक शेजारील शिवमंदीराचे परिसरात २ इसम अवैध गांजाविक्री करीत असतांना आढळले.
हिंगणघाट पोलिसांचे डीबी पथकाने त्यांना दि.१५ रोजी असता अटक केली असता त्यांचेकडून १०५ ग्राम वजनाचा सुमारे ११०० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला.
सदर आरोपींची सागर उर्फ स्वागत दुर्गाप्रसाद यादव(२१)रा. रामनगर वार्ड व हिमांशु रमेशराव सोनकुसरे(२१) रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट अशी ओळख आहे.
आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांचे जवळ एका प्लास्टीक पन्नीमध्ये १०५ ग्रॅम वजनाचा गांजा एकुण किमंत १००० रू. चा माल मिळाला. उपरोक्त प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत अप. क्र. ११९३/२०२२ कलम ८, २०(ब) २९ एन.डी.पी.एस. अन्वये आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार कैलास पुंडकर यांचे मार्गदर्शनात सपोनि. प्रशांत पाटणकर, डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे.

Previous articleधारणी शहर मध्ये पंचायत समिती कार्यालय अंतर्गत क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले
Next articleमारूळ ग्राम पंचायत अंतर्गत सुरू असलेल्या भुमिगत गटारींचे काम निकृष्ठ प्रतिचे कामाची चौकश करावी