यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे
तालुक्यातील मारूळ ग्रामपंचायत kअंतर्गत बांधण्यात आलेल्या भुमिगत गटारीचे बांधकाम हे संबधीत ठेकेदाराकडुन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले असुन या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधीतांवर कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे लिखित निवेदन रिपाई (आठवले गट )च्या अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष राजु रमजान तडवी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे . या संदर्भात यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांना दिलेल्या निवेदनात राजु रमजान तडवी यांनी म्हटले आहे की , मारूळ तालुका यावल येथील ग्रामपंचायती अंतर्गत गावात भुमिगत गटारींचे काम हे शासनाने ठरवुन दिलेल्या अंदाजपत्राकानुसार करण्यात आलेले नसुन ठेकेदाराच्या माध्यमातुन गावातील जुन्याच गटारींवर नवे बांधकाम दाखवण्यात येणार असल्याचे गोंधळ सद्या सुरु आहे . यामुळे ज्या उद्देशाने शासनाच्या लाखो खर्चाच्या निधीतुन मारूळ बसस्थानक परिसरातील मुख्य मार्गावर भुमिगत गटारींचे काम होणे अपेक्षीत होते मात्र तसे होतांना दिसत नाही . तरी या सर्व निकृष्ठ व बोगस गटारींच्या कामांची तात्काळ चौकशी करण्यात येवुन संबधीत ठेकदाराकडुन योग्य प्रकारे व गुणवत्तापुर्ण करून घ्यावे तसेच संबधीत ठेकेदार जो पर्यंत शासकीय अंदाज पत्राकानुसार भुमिगत गटारींचे काम करीत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येवु नये , पंचायत समितीच्या वारिष्ठांकडुन जर या कामांची चौकशी होवुन कार्यवाही न झाल्यास रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया ( आठवले गट )च्या माध्यमातुन यावल पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात येईल असे म्हटले आहे यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सरवर तडवी यांनी निवेदन स्विकारले