Home Breaking News नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात शासनाने कठोर आणि स्वतंत्र कायदा करा !हिन्दु जनजागृती...

नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात शासनाने कठोर आणि स्वतंत्र कायदा करा !हिन्दु जनजागृती समितीची मागणी

296

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

मुंबईतील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘लिव इन’मध्ये रहाणार्‍या आणि लग्नाविषयी विचारणा केल्यावर मारहाण करत तिची निघृणपणे हत्या करणारा लव्ह-जिहादी आफताब हा क्रूर, नराधम आहे. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या हत्येचा तपास करतांना हत्या करण्याचा उद्देश जाणून घेतला पाहिजे. हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची हजारो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. आपल्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. हिंदु पालक आणि हिंदु युवती कधी जाग्या होणार ? आपल्या पोटच्या पोरीचे ३५ तुकडे पुन्हा होऊ देणार आहात का ? या घटना पहाता राज्यात तत्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करावा, तसेच या प्रकरणी लव्ह जिहादी आफताबला तत्काळ फासावर लटकवावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे करत आहोत, असे हिंदू जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’च्या कु. सायली पाटील यांनी म्हटले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि वरील मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने यावल येथील भुसावळ टि पॉईंट येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनात कु. सायली पाटील हिने आपल्यास संत्पत भावना व्यक्त केल्यात .

एका महिला पत्रकाराला ‘कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो’ असे वात्सल्याने बोलणार्‍या पू. भिडे गुरुजी यांना नोटीस पाठवणार्‍या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांवर काही बोलतील का ? राज्यात युवती आणि महिला बेपत्ता होण्याचे भयावह प्रमाण पहाता यावर काही टिप्पणी करणार कि नाही ? असा आमचा प्रश्न आहे. बेपत्ता होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना, या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याचीही गृहखात्याने चौकशी करावी, अशी आम्ही मागणी करत आहोत, असेही कु. सायली पाटील यांनी या वेळी सांगितले.
यावल तहसीलदार महेश पवार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी डॉक्टर अभय रावते, पत्रकार सुधाकर धनगर, पत्रकार प्राची पाठक भाजचे भूषण फेगडे, हिंदुराष्ट्र सेना अध्यक्ष पियूष भोईटे, सांगवी येथील अधिवक्ता शरद कोळी, न्हावी येथील मयूर चौधरी आणि अनेक धर्मप्रेमी बांधव उपस्थित होते.

या आंदोलनात विविध हिंदु संघटनांनी सहभाग घेतला. तसेच यावल तालुक्यातील विविध गावातून धर्मप्रेमी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी ‘अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या !’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणाही देण्यात आल्या. ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, यासाठी समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही समितीच्या वतीने सांगण्यात आले.

Previous articleपोलिस प्रशासनाचा रेती ट्रक -ट्रॅक्टर चालक – मालक यांच्यावर बेकायदेशीर गुन्हे दाखल !
Next articleगट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे शेतकऱ्याच्या ‘गो’धनावर दरोडा ! शेतकऱ्याचे हातपाय बांधून, शस्त्राचा धाक दाखवून बैलजोडी, दोन गायींची चोरी