Home Breaking News अवैध धंदेवाल्यांसाठी झिरो टाॅलरन्स…गांधी, भावेंचा जिल्हा म्हणुन महाराष्ट्रात नाही देशात लौकिक मिळवुन...

अवैध धंदेवाल्यांसाठी झिरो टाॅलरन्स…गांधी, भावेंचा जिल्हा म्हणुन महाराष्ट्रात नाही देशात लौकिक मिळवुन द्यायचाय…! पोलीस अधीक्षक हसन

549

 

गुड्डू क्युरेशी
सिंदी रेल्वे ता.१६: अवैध धंदेवाल्यांसाठी यापुढे पोलीस विभागाकडुन झिरो टाॅलरन्स असुन त्यांनी हा उपद्व्याप येथेच थांबवावा अन्यथा गय केल्या जाणार नाही. माहात्मा गांधी, विनोबा भावेच्या वास्तव्यांने पुनीत झालेल्या वर्धा जिल्ह्य़ाला महाराष्ट्रात नाही तर देशात नावलौकिक मिळवुन द्यायचा असल्याचे मत शहरातील आपल्या पहिल्या भेटी प्रसंगी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी सिंदी येथे व्यक्त केला.
ते सिंदी पोलिस ठाण्याला बुधवार (ता.१६) दिलेल्या आपल्या पहिल्या नियोजित भेटी प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याला पोलीस अधीक्षक साहेबांनी दिलेल्या नियोजित भेट प्रसंगी आयोजित केलेल्या संवाद बैठकीत ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील, शांतता समितीचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्टीत नागरीक आणि पालिकेतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सर्वप्रथम जिल्ह्यातील अवैध धंद्याबाबत बदललेली परिस्थिती कशी वाटते. असा प्रश्‍न करित दारु मिळावी कि मिळु नये आपण समाधानी आहा की नाही असे प्रश्न विचारले असता उपस्थित सर्वानी अधिक्षक साहेबांचे एकसुरात अभिनंदन केले आणि हिच बदलेली परिस्थिती चिरकाल राहावी अशी विनंती केली. यावर उत्तर देतांना हसन साहेब म्हणाले मला सुध्दा हटविण्यासाठी काही मंडळी कामी लागली आहे मात्र हमारीभी जडे बहुत मजबुत है हमभी नरुल हसन है साहब…! असे सांगित आपले इरादे स्पष्ट केले.
अवैध धंदे वाल्यांनी जिल्हा सोडावा नाही तर आत जावे. असे ठनकावुन सांगतांनाच यापुढे ज्यांच्याकडे मनी आणि मस्सल पावर नाही अशा गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या पाठीशी हक्काचा माणूस म्हणून नरुल हसन उभा आहे. कोणावरही अन्याय होणार नाही.असे सांगत आपल्या हळव्या मनाचा कोपरा पण येथे व्यक्त केला.
उपस्थितांनी मांडलेल्या समस्येत पशु धनाची चोरी, दारुची होम डीलेवरी,चोरीच्या रेतीचा फोफावलेला अवैध व्यवसाय, अतिक्रमणामुळे शहरात वाहतुकीची होणारी कोंडी, पोळा प्रसिद्ध सिंदी शहरातील दुपारी भरणाऱ्या बालगोपालाच्या पोळ्याला सुध्दा यापुढे पोलीस बंदोबस्त मिळावा, आठवडी बाजारात भुरटय़ा चोरांचा वाढलेला वावर आदी समस्यांची माहीती अधिक्षक साहेबांना दिली असता प्रत्येक समस्यावर स्वतंत्र चर्चा करुन अधिक्षक साहेबांनी या समस्येचे लवकरच निराकरन करण्याची उपस्थितांना ग्वाही दिली.
यावेळी सिंदी ठाण्यांचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे आणि त्यांचा पुर्ण स्टाप उपस्थित होता.


संवाद बैठकीला आशिष देवतळे, सुधाकर खेडकर, अशोक कलोडे, दत्ता कोपरकर, असलम पठान, फिरोज बेरा, अजीम शेख, रवी राणा,
प्रभाकर तुमाने, मुन्ना शुक्ला, बालु इंगोले आदी तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद छाजेड, सचिव बबलू खान, ओमप्रकाश राठी, मोहन सुरकार, गुड्डू क्युरेशी, तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावखेड्यातील महीला पुरुष पोलीस पाटील आदीची उपस्थिती होती.
फोटो ओळी

Previous articleगट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे शेतकऱ्याच्या ‘गो’धनावर दरोडा ! शेतकऱ्याचे हातपाय बांधून, शस्त्राचा धाक दाखवून बैलजोडी, दोन गायींची चोरी
Next articleरेती ट्रॅक्टर मालकाच्या निवेदनावरून अवैद्य धंद्याची केली पोलखोल ! अवि नवरखेले