Home Breaking News महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या बेताल विधानाचा मा जालिंधर बुधवत यांच्या...

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या बेताल विधानाचा मा जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलडाणा विधानसभा शिवसेनेच्या वतीने केला निषेध.

119

 

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संपूर्ण भारताचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केले. यामुळे महाराष्ट्रासह तमाम जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. या विधानाचा निषेध म्हणून बुलडाणा विधानसभा शिवसेनेच्या वतीने मा जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हाप्रमुख बुलडाणा यांच्या नेतृत्वात म. आ. जिल्हा संघटिका सौ जिजताई राठोड, उप जिल्हा प्रमुख संजय हाडे, मा तालुका प्रमुख डॉ मधुसूदन सावळे, उप जिल्हा संघटिका नंदिनीताई रिंढे, विधानसभा संघटक अशोक इंगळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलडाणा येथे आज दिनांक २१/११/२०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडो मारो आंदोलन करून त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भगत सिंह कोश्यारी हे वारंवार बेताल विधाने करत असून त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावत आहे. त्यांना राज्यपाल पदावर राहण्याचा अधिकार नसून, महाराष्ट्रातील जनता यापुढे हे कदापि खपवून घेणार नसल्याचे मनोगत याप्रसंगी तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी पं. स. मा सभापती सुधाकर आघव, युवासेना तालुका प्रमुख निलेश राठोड, वै.आ. तालुका प्रमुख डॉ अरुण पोफळे, शहर संघटक जगदीश मानतकर, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, आशिष बाबा खरात, गजानन उबरहंडे, सतीश राजपूत, अनिल रिंढे, किशोर कानडजे, बबन खरे, संदेश वानखेडे, रामदास काकडे, पद्माताई परदेशी, राहुल जाधव, विनोद तोटे, राहुल शेलार, रवींद्र भोंडे, सचिन मिसाळ, विकी जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
◼️♦️◼️♦️◼️♦️◼️♦️◼️

Previous articleराज्यपाल कोशारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदी विरोधात निषेध आंदोलन पदावरून काढण्याची मागणी
Next articleशिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कारंजा चौक येथे निषेध आंदोलन