Home जालना अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन सुध्दा नेर व इतर काही मंडळ का वगळण्यात आले,ते...

अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन सुध्दा नेर व इतर काही मंडळ का वगळण्यात आले,ते तात्काळ नुकसान ग्रस्त बाधीत यादीत समाविष्ट करण्यात यावे असा इशारा मनसे तर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहेत:

453

 

(प्रतिनिधी-तुकाराम राठोड)

जालना-जिल्ह्यासह तालुक्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कपाशी,सोयाबीन,तसेच फळ पिकाची अतोनात नुकसान झाले होते.सदर नुकसान होऊन सुद्धा शासन-प्रशासने ते जाणून-बुजून दुर्लक्ष करून वगळण्यात आले आहेत.याचे काय कारण आहेत.नेर व इतर काही मंडळ अतिवृष्टीमुळे बांधीत यादीमध्ये तात्काळ समाविष्ट करावे व गोरगरीब,कष्टकरी शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी.असा इशारा मनसेतर्फे तहसीलदार जालना यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.अन्यथा मनसेच्या वतीने येत्या दोन दिवसात आंदोलन करण्यात येईल.या आंदोलनात जे काही बरे वाईट किंवा अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी जबाबदारी शासन-प्रशासनाची राहील,याची आपण नोंद घ्यावी. या निवेदनावर तालुका उपाध्यक्ष श्रीकांत राठोड,तालुका अध्यक्ष कृष्णा खलसे,मधुकर कुरेवाड,राजेश राठोड यांच्या स्वाक्षरया आहेत.

Previous articleशिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कारंजा चौक येथे निषेध आंदोलन
Next articleजालना शहराचे वैभव असलेला “बडीसडक” रस्त्यासाठी  रु.५.७५ कोटी मंजूर: