(प्रतिनिधी-तुकाराम राठोड)
जालना- शहराचे वैभव असलेला ‘बडीसडक’ नावाने ओळखला जाणारा रस्ता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दधीची चौक पर्यंत रस्त्यासाठी दिनांक 18/11/2022 रोजी महाराष्ट्र शासनाने रु.५७५ लक्ष मंजुर केल्याची माहिती केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.निवेदनामध्ये पुढे असे म्हटले आहे की, 2014 ते 2019 या कालावधीमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर असताना ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना शहरातील विविध सिमेंट रस्त्यासाठी रु.70 कोटी मंजूर केले होते, या मंजूर निधीतून शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहेत. जालना शहराला सिमेंट रस्ते ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखविले. अगोदरच्या काळामध्ये जालना शहरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाले होते,नागरिकांना याचा खूप त्रास होत होता, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्याचा त्रास सुरू झाला होता, परंतु ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी मंजूर करून आणलेल्या रु.70 कोटी निधीमधून शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले त्यामुळे शहरातील नागरिकांनी ना.रावसाहेब पाटील दानवे यांचे धन्यवाद देऊन आभार मानले.परंतु दरम्यानच्या काळात 2019 मध्ये बहुमत येऊनही भाजपा सत्तेच्या बाहेर राहिल्यामुळे शहरातील महत्त्वाचा आणि जालना शहराचे वैभव असणारा “बडीसडक” या नावाने ओळखला जाणारा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दधीची चौक(मुर्गी तलाव) पर्यंतचा रस्ता सिमेंटीकरण करण्याचे राहून गेला,आघाडी शासनाच्या काळातही या महत्त्वाच्या रस्त्यासाठी निधी प्राप्त न झाल्यामुळे सदर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती, रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडली होती, हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिला नव्हता आणि शहरातील प्रत्येक नागरिकाला या रस्त्यावरून जावे लागत असे एवढा हा रस्ता महत्त्वाचा होता.दरम्यानच्या काळामध्ये महाविकास आघाडी शासनाची सत्ता जाऊन भाजपा+सेना (शिंदेगट) चे सरकार सत्तेत आले आणि या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या, आपल्या रस्त्याचे भाग्य उजळणार ना.केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणणार असा विश्वास त्या भागातील नागरिकांमध्ये निर्माण झाला.
त्यामुळे या भागातील नागरिकांनी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे हा रस्ता जालना शहराचे वैभव असतानाही जाणून बुजून दुर्लक्ष तर होत नाही ना ? शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटची बनली मग बडीसडक साठी निधी मंजूर का होत नाही असा प्रश्न करून या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली.त्यामुळे ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांचे बंधू मा.भास्कर (आबा) दानवे यांना त्या परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन समस्या जाणून घेण्याचे सांगितले.त्यानुसार मा.भास्कर (आबा) दानवे यांनी श्री.मनीष बगडिया, चेतन देसरडा व विजय कामड यांच्यासह श्री.धानवाला यांच्या घरी दोन वेगळ्या दिनांक १७/११/२०२२ रोजी रात्री ८.०० वा त्या परिसरातील नागरिकांच्या बैठका घेऊन समस्या जाणून घेतल्या, बैठकी मधील सर्व नागरिकांनी बडीसडक हा रस्ता खूपच खराब झाला असून हा रस्ता चांगल्या पद्धतीने भूमिगत नालीसह बनवावा अशी विनंती केली.या बैठकीचा अहवाल मा.भास्कर (आबा) दानवे यांनी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांना फोनवर कळविला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच दिनांक 18/11/2022 रोजी सदरील रस्त्यासाठी रु.575 लक्ष महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्याची माहिती ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले.जालना शहरातील अत्यंत महत्त्वाचा प्रलंबित असलेले दोन प्रश्न ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी चुटकीसरशी सोडविले. जालना शहरातील कन्हैयानगर समोरील रस्त्याचा प्रश्न व जालना शहराचे वैभव असलेला रस्ता बडीसडक या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला होता. सदरील दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी योग्य राहिले नव्हते, रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले होते, या रस्त्यावर अनेक वेळा अपघातही झाले होते तर चार ते पाच नागरिकांचा बळीही या रस्त्याने घेतला होता. मात्र भाजपा+सेना (शिंदेगट) चे सरकार सत्तेत येताच ना.रावसाहेब पाटील दानवे ॲक्शन मोड मध्ये आले आणि कन्हैयानगर समोरील रस्त्यासाठी वन विभागातील सर्व अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, जालना यांच्या कॅबिनमध्ये मीटिंग घेतली आणि तात्काळ सदर रस्त्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले व प्रत्यक्षात काम सुरूही झाले आहे. “बडीसडक” या रस्त्यासाठी रु.575 लक्ष निधी मंजूर करून आणल्याने हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रलंबित दोन प्रश्न केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी चुटकीसरशी सोडविला,हे फक्त दानवे च करू शकतात असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
गोवर्धन कोल्हे,स्वीय सहाय्यक
(ना.रावसाहेब पाटील दानवे)