Home Breaking News शब्दांचा अतिसार झालेला व थिल्लर राज्यपाल महाराष्ट्राला लाभावा हेच दुर्दैव!

शब्दांचा अतिसार झालेला व थिल्लर राज्यपाल महाराष्ट्राला लाभावा हेच दुर्दैव!

118

 

प्रतिनिधी:(जालना)राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व दिलीप धोत्रे,प्रकाश महाजन,संतोष नागरगोजे,अशोक तावरे राज्य,सतेनाम गुल्हाटी,गजानन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली व कृष्णा खलसे यांच्या अध्यक्षतेखाली विरेगाव येथे आंदोलन करण्यात आले.मा.राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावचा जाहीर निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निदर्शने आंदोलन करून निषेध करण्यात आला.राज्यपाल महोदय यांनी संभाजीनगर येथील कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त,शिवप्रेमी यांचे मन दुखवल्यामुळे राज्यपाल यांचा निषेध नोंदवण्यात करिता विरेगाव येथे मंगळवारी दहा वाजता तीव्र स्वरूपाचा निदर्शने व आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला आहे.यावेळी उपस्थित कृष्णा खलसे,ॲड.हरीदास लांडे,श्रीकांत राठोड,कृष्णा पिसोरे,राम कातकडे,महादेव भोकरे,ऋषिकेश कावळे,सुनील चव्हाण,बाळासाहेब जाधव,अनिल जाधव,शिवाजी जाधव,गणेश बाहेरकर,गणेश जाधव,राम गुंजाळ,रामेश्वर जाधव,मचिंद्र राठोड,शरद जाधव,गोवर्धन जाधव,बालासाहेब जाधव,आकाश खरात,बालासाहेब देवडे,विलास घाटे,दिपक राऊत,कृष्णा काटकर,जिवा जाधव आदी शिवप्रेमी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Previous articleसांगवी खुर्द येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून दोन गटात वाद एका वयोवृद्ध व्याक्तीस मारहाण चौघाविरुद्ध गुन्हा दाखल
Next articleयावल पंचायत समितीच्या शासकीय गाडीला अपघात गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार