Home Breaking News बाळापूर तालुक्यातील देशी दारु विक्रेत्यावर उरळ पोलिसांची कारवाई

बाळापूर तालुक्यातील देशी दारु विक्रेत्यावर उरळ पोलिसांची कारवाई

286

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत झुरळ बु.येथे दोन ठिकाणी विनापरवाना अवैधरित्या देशी दारूची विक्री करताना दोन इसमांना पोलिसांनी रंगेहाथ पकडुन त्यांच्याकडून दोन हजार चारशे रुपये किंमतीची देशी दारूचे 30 क्वाटर जप्त करून दोन जणांविरुद्ध उरळ पोलिसांनी 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान गुन्हा दाखल केला आहे झुरळ बु.येथे दोन इसम राहत्या घरातुन गेल्या काही दिवसांपासून विनापरवाना अवैधरित्या देशी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार अनंतराव वडतकर यांना मिळाली होती.त्या माहीतीच्या आधारावर सापळा रचून होते.त्यादरम्यान सदानंद भोजने हा त्यांच्या राहत्या घराच्या अंगणातून अवैधरित्या देशी दारु विक्री करत होता तेव्हा पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडुन त्यांच्याकडून देशी दारूची 18 क्वाटर असा 1हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदानंद विरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तसेच त्याच गावातील अनिल तायडे यालासुद्धा देशी दारूची विक्री करताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडुन त्यांच्याकडून 960 रूपये किंमतीचे देशी दारूचे 12 क्वाटर जप्त करून अनिल तायडे विरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई ठाणेदार अनंतराव वडतकर,व त्यांचे कार्यकर्ते बीट जमादार विजय झाकरडे, रघुनाथ नेमाडे, कांताराम तांबडे यांनी केली आहे

Previous articleन. प . हद्दीतील भागात स्वतंत्र दफनभूमी ची वेवास्था करून देण्यासाठी दशमान गोसावी समाधी बचाव समितीचे निवेदन
Next articleअर्धशतका पेक्षा अधिक जुने व जिर्ण झालेल्या यावल बसस्थानकाच्या ईमारतीचे नुतनीकरण कधी होणार प्रवासांच्या मनातील प्रश्न