Home Breaking News भाजपला सोडचिट्ठी देत अल्पसंख्याकचे शहराध्यक्षांचा शेकडो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल ….

भाजपला सोडचिट्ठी देत अल्पसंख्याकचे शहराध्यक्षांचा शेकडो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल ….

406

 

सुभाष मंडळाचे अध्यक्ष समाजसेवक अनिल लांबट यांचाही रा.काँग्रेस पक्षात प्रवेश

प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब यांच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश मेळावा…

प्रतिनीधी :-सचीन वाघे हिंगणघाट,

समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी ,कार्यकर्त्यांसह अनेकांनी शेकडोच्या संख्येत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे अल्पसंख्याक विभाग प्रदेश कार्याध्यक्ष जावेदजी हबीब यांच्या प्रमुख उपस्थितीत महावीर भवन येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी केले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रिय मंत्री तथा वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सुबोधजी मोहिते, वर्धा जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष खलीत साहेब, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नावेद शेख, माजी आमदार राजू तिमांडे, माजी नगरसेवक प्रलय तेलंग, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,
जिल्हा उपाध्यक्ष दिनकर घोरपडे, नागपूर जिल्हा निरीक्षक सुरेखाताई देशमुख, शहर अध्यक्ष विठ्ठल गुळघाने, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, , युवक जिल्हा कार्याध्यक्ष सचिन पारसडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष हरीश काळे, जिल्हा उपाध्यक्ष पवन तिजारे ,
सिंदी रेल्वे शहराध्यक्ष गंगाधरजी कलोडे, चैनकरणंजी कोचर, कामगार नेते आफताब खान,
माजी नगरसेवक धंनजय बकाने, , अनिकेत कांबळे, माजी नगरसेवक अनिल भोंगाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याकचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब बोलताना यांच्या हिंगणघाट येथील मतदार संघातील तरुणाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यावर यांच्या विचाराला प्रेरित होऊन पक्षात काम करण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. असा प्रचंड विश्वास तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असुद्या. याची अनुभूती आज तरुणांची गर्दी पाहून आली, असे प्रतिपादन प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब यांनी यावेळी व्यक्त केले.
हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत असून आपण त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सर्व गटतट विसरून आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. आपण एकत्र आलो तर जागा राष्ट्रवादी काँग्रेस हमखास जिंकेल, असा विश्वास जावेद हबीब यांनी यावेळी व्यक्त केला.
यामेळावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भाजप अल्पसंख्याकचे शहर अध्यक्ष मोहम्मद साबीरभाई ,सुभाष मंडळाचे अध्यक्ष अनिलभाऊ लांबट, रहीमभाई पट्टेवाले,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण रघाटाटे, धनराज शेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल मापारी संघाचे समाजसेवक नानाभाऊ हाते यांच्यासह त्यांचे सहकारी, शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक सुरेश तांदुळाकर,माजी सरपंच भास्करराव मानकर, ग्रा.सदस्य सौ. रंजना बावणे, समाजसेविका अर्चना कलोडे,सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ चौधरी, किरण तांदुळकर, भोई समाज क्रांति एकता दल उब्दा शाखा अध्यक्ष,सौ.वैशालीताई मेश्राम व त्याचे सहकारी,रोहित लेदे, माजी सरपंच दिलीप कुंभलकर, सुरेश कुलसंगे,नांदगाव ऑटो चौक युनियनचे पदाधिकारी, डॉ. ठाकुरदास रॉय, तलत पठाण, रेश्माताई मेश्राम, दर्शनाताई काळे, ज्योतीताई काळे, ज्योतीताई कापकर, आचलताई वकील, सपनाताई मुन्ने, अर्चनाताई डोंगरे, शम्मा अजुम, वैशालीताई भगत, रजनीताई महाकाळे, अश्विनिताई विश्नोई, रमेश भेदूरकर, झोंगुजी तुराळे, आकाश हुरले, राजू धात्रक, शाकिर अली यांच्यासह शेकडो लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.

Previous articleथकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे कनेक्शन कट करणे तात्काळ थांबवा,अन्यथा आसुडाचा प्रसाद देणार….कृष्णा खलसे(मनसे तालुकाध्यक्ष जालना)
Next article3 डिसेंबर अंपग जागतीक दिनी अंपगासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन