Home वर्धा मोहता शाळा नवीन इमारत मधील पीओपी ढाचा पडला त्या मागे शाळा व्यवस्थापक...

मोहता शाळा नवीन इमारत मधील पीओपी ढाचा पडला त्या मागे शाळा व्यवस्थापक यांचे दुर्लक्ष !

409

 

सचिन वाघे प्रतिनिधी
दि.25 नोव्हेंबर
हिंगणघाट :- शहरातील ऐतिहासिक मोहता शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम आठ कोटी ब्यांशी लाख रुपयांचा खर्च करून बांधण्यात आला. या इमारतीचे उद्घघाटन मा. नितीन गडकरी यांनी केले होते. सहा महिन्यातच इमारतीच्या पीओपीचा ढाचा कोसळला ? प्रतिनिधी यांनी शाळेत भेट दिली असता पाईपलाईन लिकेज असल्यामुळे ते पाणी स्लॅपला पाझरत होते ते पाणी पीओपी शोषून घेत होती त्यामुळे पीओपी चा ढाचा पडला. याशिवाय अनेक बाबतीत मुख्याध्यापक यांचे दुर्लक्ष होत आहे हे लक्षात येते .

मुख्याध्यापक गंगाधर ढगे :- आम्ही या विषयावर अनेकदा इंजिनियर यांना कळविले आहे त्यांनी या ठिकाणी भेट दिली.

हिंगणघाट नगरपालिका मुख्याधिकारी हर्षल गायकवाड :- पाईप लिकेज झाल्यामुळे पीओपीने पूर्ण पाणी शोषून घेतले. जिथे जिथे पाईपलाईन लिकेज झाली त्या ठिकाणी पीओपी पडले ठेकेदारास पीओपी फिटिंग व नळ पाईपलाईन चेक करून बदलण्याचे निर्देश दिले. या अगोदर मुख्याध्यापक यांनी कोणतीही लिखित तक्रार केली नाही . मुख्याध्यापक यांनी लेखी तक्रार पीओपी ढाचा पडल्यानंतर दिली.

Previous article3 डिसेंबर अंपग जागतीक दिनी अंपगासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन
Next articleसंविधान दिन लोकोत्सव व्हावा”