Home Breaking News Pik Vima Nuksan पिक विमा काढलेल्या परंतु पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहणाऱ्या...

Pik Vima Nuksan पिक विमा काढलेल्या परंतु पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम द्या

219

 

संग्रामपूर तालुका शिवसेना किसान सेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

तालुक्यातील शेतकऱ्यांनी ए आय सी AIC कंपनीकडून आपल्या शेतातील पिकांचा पीक विमा काढलेला आहे व या विमा कंपनीकडून पिक विम्याचे पैसेही काही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहेत मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पिक विमा pik Vima काढल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पर्यंतही पिक विमा रकमेचे पैसे आलेले नाहीत त्यामुळे पिक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्या तसेच पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तोकडे पैसे मिळालेले आहेत व काही शेतकऱ्यांनी पिक विमा काढला मात्र त्यांना अद्याप पर्यंत ही पीक विमा चे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे तात्काळ पिक विमा काढलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्या या मागणणीसाठी शिवसेना किसान सेनेचे तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांनी तालुका कृषी अधिकारी यांना 28 नोव्हेंबर रोजी निवेदन दिले आहे

सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना जी विमा रक्कम मिळालेली आहे ती अत्यंत तोकडी आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पिक विमा काढल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पर्यंतही पिक विमा रक्कमेचे पैसे आलेले नाहीत तसेच पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तोकडी रक्कम मिळालेली आहे. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे .

त्यामुळे पिक विम्याच्या रकमेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्या तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे फोटो विमा कंपनीचे साईडवर अपलोड केले त्या शेतकऱ्यांनाही विमा रक्कम (क्लेम) मिळालेला नाही तर काही शेतकऱ्यांना प्रीमियम पेक्षाही विमा रक्कम कमी मिळालेली आहे तसेच नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड करीत असताना विमा कंपनीच्या साईडवर काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड करता आले नाही त्यामुळे विमा कंपनीने अशा शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम (लाभ) दिलेला नाही त्यामुळे विमा काढल्यानंतरही बरेचसे शेतकरी पिक विम्याच्या रकमेपासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे तात्काळ विमा रकमेच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक विम्याची रक्कम द्या ,अन्यथा आम्ही संग्रामपूर तालुक्यातील शिवसैनिक लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा या निवेदनातून देण्यात आलेला आहे या निवेदनावर किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे , शुभम घाटे शहर प्रमुख, विजय मारोडे उप तालुकाप्रमुख, राहुल मेटांगे, शिवाजी अढाव , धनंजय आवचार, बाबुराव जाधव ,नितीन भिसे ,सुनील मुकुंद, रवींद्र मारोडे विशाल बांगर, शेख अब्दुल शेख लुकमान, पुंडलिक खानझोड अमोल देशमुख आदी शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत

Previous articleरामनगर-जैतापूर,बाजीउम्रद-तलाव सावंगी,मानेगाव-लालदेव फाटा रस्त्यांची दुरावस्था,तिन्ही रस्त्यांना तात्काळ मंजूरी देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री Ravsaheb Danve यांना साकडे
Next articlePolice Bharti “पोलीस भरती अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी हर्षल पाटील फदाट यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी”