Home Breaking News Police Bharti “पोलीस भरती अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी हर्षल पाटील फदाट...

Police Bharti “पोलीस भरती अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी हर्षल पाटील फदाट यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी”

243

“पोलीस भरती अर्ज Police bharti करण्यास मुदतवाढ देण्यात यावी हर्षल पाटील फदाट यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या कडे मागणी”

नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. अर्ज भरताना वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याचा अनुभव उमेदवारांना येत आहे. त्यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

मागच्या कित्येक दिवसांपासून पोलीस भरतीवरून महाराष्ट्रात घमासान सुरू आहे. अखेर भरती प्रक्रीयेत फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. तरी बहुप्रतिक्षित पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली मात्र ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.फॉर्म भरण्यासाठी अवघे एकच दिवस उरल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल पाठवून केली आहे.

“अनेक उमदेवारांचे अद्याप रजिस्ट्रेशन न झाल्याने काही उमेदवारांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली आहे. सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवारांना अडचणी येत आहे. सतत शासनाची वेबसाइट स्लो झाल्याने अर्ज कसा करायचा असा प्रश्न उमेदवारांपुढे उभा राहिला आहे. अनेक वर्षानंतर ही भरती होतं आहे. ही संधी गेले तरी काही उमेदवाराच वय देखील संपत आलं आहे तरुणांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागातून अनेक उमेदवारांना सायबर कॅफेतमध्येच अर्जासाठी रात्र काढावी लागत असल्याचे हर्षल पाटील फदाट यांनी सांगितले.”

नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे.

अर्ज भरताना वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याचा अनुभव उमेदवारांना येत आहे. त्यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

मागच्या कित्येक दिवसांपासून पोलीस भरतीवरून महाराष्ट्रात घमासान सुरू आहे. अखेर भरती प्रक्रीयेत फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. तरी बहुप्रतिक्षित पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली मात्र ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे.

उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.फॉर्म भरण्यासाठी अवघे एकच दिवस उरल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल पाठवून केली आहे.

“अनेक उमदेवारांचे अद्याप रजिस्ट्रेशन न झाल्याने काही उमेदवारांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली आहे. सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवारांना अडचणी येत आहे. सतत शासनाची वेबसाइट स्लो झाल्याने अर्ज कसा करायचा असा प्रश्न उमेदवारांपुढे उभा राहिला आहे. अनेक वर्षानंतर ही भरती होतं आहे. ही संधी गेले तरी काही उमेदवाराच वय देखील संपत आलं आहे तरुणांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागातून अनेक उमेदवारांना सायबर कॅफेतमध्येच अर्जासाठी रात्र काढावी लागत असल्याचे हर्षल पाटील फदाट यांनी सांगितले.”

Previous articlePik Vima Nuksan पिक विमा काढलेल्या परंतु पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम द्या
Next articlePolice Bharti पोलिस भरती प्रक्रियेतील तांत्रीक व्यत्यय थांबवा भरती इच्छुक उमेदवारांचे प्रशासनाला निवेदन