Home Breaking News कोरपावली विरावली रस्त्यावर पादचाऱ्यास धडक देत मृत्युस कारणीभुत अज्ञात वाहन चालका विरूद्ध...

कोरपावली विरावली रस्त्यावर पादचाऱ्यास धडक देत मृत्युस कारणीभुत अज्ञात वाहन चालका विरूद्ध गुन्हा दाखल

371

 

यावल Yaval ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील कोरपावली विरावली दरम्यान पादचारी व्याक्तीला धडक देवुन झालेल्या भिषण अपघाती मृत्यु बाबत यावल पोलीसा ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भातील मिळालेली अशी की , काल दिनांक २८ नॉव्हेबर रोजी दुपारी १२वाजेच्या सुमारास कोरपावली येथील राहणारे फिरोज लतीफ तडवी वय ४२ वर्ष यांचा कोरपावली ते विरावली रस्त्यावरील महेलखेडी येथील शेतकरी मधुकर रायभान पाटील यांच्या शेताजवळ रस्त्याने जात असतांना यावल कडून कोरपावलीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच १९डीव्ही ७२२९या वाहनास नांव गाव माहीत नाहीत अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत अविचाराने वाहन चालवित विरावली कडील रस्त्याच्या डावीकडे पायदळ शेतात जाणाऱ्या फिरोज तडवी यांना जोरदार धडक देत दुखापत करून मृत्युस कारणीभुत ठरला असून , अपघातातील मयताचे भाऊ रशीद लतीफ तडवी वय ४५ वर्ष यांनी दिनांक २९ नॉव्हेबर रोजी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात वाहनचालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय देवरे हे तपास करीत आहे . दरम्यान अपघातास कारणीभुत वाहनास पोलीसांनी जप्त केले आहे .

Previous articleयुवासेना उपतालुका प्रमुख पदी ओम साकरकार यांची निवड*
Next articleनगर परिषद हिंगनघाट द्वारा राबविण्यात येत आहे शाळाबाह्य विद्यार्थी मुहिम