Home Breaking News चोरीला गेलेले 94,736 /- रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात,उरळ पोलीस स्टेशनला यश.

चोरीला गेलेले 94,736 /- रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात,उरळ पोलीस स्टेशनला यश.

431

 

Akola प्रतिनिधी
अशोक भाकरे

अकोला -:चोरीला गेलेले 94,736 /- रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात,उरळ येथील पोलीस स्टेशनला यश.
अधिक माहिती अशी कि,अकोला जिल्ह्यातील बाळपुर तालुक्यातील पोलीस स्टेशन उरळ येथे आज रोजी दिनांक -: 30 नोव्हेंबर रोजी पोस्ट परिसरातील मागील चार ते पाच महिन्यापासून फिर्यादी यांनी आपले मोबाईल मिसिंग झाल्या बाबत उरण पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या होत्या.

त्याबाबत पोलीस स्टेशनं चे ठाणेदार अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शना खाली एक पथक तयार करण्यात आले. मोबाईलचा सायबर सेलची मदत घेऊन सदर मोबाईल तात्काळ शोध लावण्यात उरळ पोलीस स्टेशनला यश आले. व आज 30 नोव्हेंबर रोजी सदर फिर्यादी नामे कुणाल भीमराव तायडे राहणार. निंबा ,
संजय महादेव वानखडे राहणार.

गायगाव,विशाल श्रीपत परघरमोर रा. स्वरूपखेड,
विष्णू रामेश्वर बोर्डे राहणार शिंगोली,
अशपाक अहमद देशमुख राहणार. लोहारा, रोहित भास्कर चवरे राहणार.

अंत्री मलकापूर,नागेश राजू पाटील रा. खंडाळा. अधिक दोन इसम असे एकूण, 09 लोकांचे मिसिंग झालेले एकूण 09 मोबाईल.
सदर मोबाईल यांची अंदाजे किंमत 94,736/- रुपये व तसेच फिर्यादी माणिकराव रामभाऊ टाले रा.बादलापूर यांचे गुन्ह्यातील 21000/- रुपये रोख हे त्यांना परत करण्यात आले आहेत.
अशा प्रकारे उरळ पोलीस स्टेशन ने फिर्यादी यांचा मुद्देमाल हा त्यांना परत करण्यात आला आहे.


सदर कामगिरी करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकार, पोलीस अंमलदार राजाराम राऊत,अशोक पटोकार,शैलेश घुगे, सुनील सपकाळ आदी.

Previous articleभाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जालना जिल्हा शहर व ग्रामीण प्रभारी श्रीरामजी मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन:
Next articleयावल पंचायत समितीतील ग्रामीण पाणीटंचाई विभागाचे रविन्द्र देशमुख यांची तिन दशकांतर जामनेर येथे बदली