Home Breaking News यावल पंचायत समितीतील ग्रामीण पाणीटंचाई विभागाचे रविन्द्र देशमुख यांची तिन दशकांतर जामनेर...

यावल पंचायत समितीतील ग्रामीण पाणीटंचाई विभागाचे रविन्द्र देशमुख यांची तिन दशकांतर जामनेर येथे बदली

292

 

Yaval यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पंचायत समितीच्या पाणी टंचाई विभागात गेली तिन दशकापासुन सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी रविन्द्र प्रल्हाद देशमुख यांची जामनेर पंचायत समिती येथे बदली झाली आहे . रविन्द्र प्रल्हाद देशमुख हे मुळ हिवरखेडा तालुका जामनेर येथील रहीवाशी असुन, आपले शिक्षण पुर्ण झाल्यावर देशमुख यांनी यावल येथे ७ / ३ / १९९१या वर्षी पंचायत समितीत आपल्या प्रशासकीय सेवाकार्यास सुरुवात केली होती .

यावल पंचायत समितीच्या कार्यालयात ग्रामीण पाणीटंचाई विभागात त्यांनी सतत ३२ वर्ष तिन दशकापेक्षा अधिक काळ त्यांनी उत्कृष्ठरित्या एक उमदा व सर्व प्रिय असे कर्मचारी म्हणुन आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली . ३० नॉव्हेबर २०२२रोजी त्यांची प्रशासकीय मार्गाने जामनेर येथील पंचायत समितीत बदली झाली असुन , यावल पंचायत समितीत मागील ३२ वर्ष सेवा करीत असतांना त्यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा एक मोठा कुटुंब निर्माण केले , यावल पंचायत समितीचा पदभार सोडतांना रविन्द्र देशमुख हे अत्यंत भावुक झाले होते .

पण नौकरी आली म्हणजे बदली असते असे सांगुन त्यांनी आपल्या जन्मभुमि असलेल्या जामनेर तालुक्याची आपल्यास सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद ही त्यांनी व्यक्त केला . यावेळी त्यांना यावल पंचायत समिती कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी , तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रूबाब तडवी, सचिव पी . व्हि तळेले,हितेन्द्र महाजन , ग्रामसेवक मजीद तडवी , संगणक विभागाचे मिलींद कुरकुरे , जावेद तडवी , अक्षय शिरसाठ , चेतन चौधरी यांच्या आदीनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात .

Previous articleचोरीला गेलेले 94,736 /- रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात,उरळ पोलीस स्टेशनला यश.
Next articleमौजपुरी,सेवली,रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गोरगरिबांना मिळत नाही न्याय,पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे,पोलीस निरीक्षकांना आवर कधी घालणार?