Home Breaking News मौजपुरी,सेवली,रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गोरगरिबांना मिळत नाही न्याय,पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे,पोलीस निरीक्षकांना...

मौजपुरी,सेवली,रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गोरगरिबांना मिळत नाही न्याय,पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे,पोलीस निरीक्षकांना आवर कधी घालणार?

208

 

प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील निरखेडा येथील ज्ञानेश्वर हरिश्चंद्र राठोड यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,दि.२७/११/२०२२ रोजी रात्री ९:३० वाजता गावातून घरी जात असताना,तांड्यातील चार ते पाच जणांनी मिळून मला मारहाण केली आहे.हि घटना दि.१५/११/२०२२ रोजी दुपारी चार ते पाच वाजे दरम्यान निरखेडा तांडा येथे घडली आहे.मिळालेली माहिती अशी की,ज्ञानेश्वर राठोड हे नेहमीप्रमाणे गावातून तांड्याकडे नेहमीप्रमाणे जात असताना,रस्त्यावर तांड्यातील दोन व्यक्ती ची भेट झाली.व ते म्हणाले की,मला तुम्ही माझ्या मागच्या भांडणात का मदत केली नाही.असे म्हणून मला दोघांनी शिवगाळ करून चापटबुक्यांनी मारण केली.यावेळी मी सदर घटनेची तक्रार मौजपुरी पोलीस स्टेशन ला दि.१५/११/२०२२ रोजी दिली आहे.तसेच सदर घटने संदर्भात मौजपुरी पोलीस स्टेशन येथे एनसी क्रमांक ५०२/२०२२ तक्रारीची नोंद केली आहे.तसेच आतापर्यंत कुठल्याच प्रकारची दखल पोलीस प्रशासनाने घेतलेली नाही.वारंवार ज्ञानेश्वर राठोड हे मौजपुरी पोलिसांना जाऊन गाडीची नुकसान झाल्या संदर्भात विचारणा करत आहे.पण कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यामार्फत मिळत नाही.मग गोरगरिबांना न्याय कधी मिळणार हा आमचा सवाल आहे.मग पोलीस प्रशासन करत आहे काय?,त्यांची गरज कशासाठी हा मोठा एक्स प्रश्न आहे.या सदर गोष्टीचा राग मनात धरून त्यांनी दि.२७/११/२०२२ रोजी ज्ञानेश्वर राठोड यांच्या मालकीची घरासमोर असलेली मोटर सायकल एचएफ डीलक्स घरासमोरून घेऊन गेले व मोटारसायकलची तोडफोड व नुकसान केली आहे.तसेच सदर गाडीची नुकसान करण्या अगोदर मी त्यांना माझी गाडी परत करा म्हणन सांगितली होते.त्यांनी मला सांगितले की तुला काय करायचे ते करून घे व आमचे कुणीही वाकडे करू शकत नाही.व पोलीस प्रशासन आमच्या खिशात आहे.अशा प्रकारच्या दम दिला.अशा प्रकारच्या धमक्या देऊन ते तेथुन निघुन गेले.या बाबत मी मौजपुरी पोलीस स्टेशन येथील पोलिसांना माहिती दिली.तरी पण अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालावा व अशा मंजुर लोकांना कायद्याचा धाक राहिलेले नाही.त्यामुळे मौजपुरी,रामनगर आणि सेवली परिसरात नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सर्व निर्माण होत आहे.तरी,पण आपले पोलीस अधिकारी,कर्मचारी कुठलीही प्रकारची चौकशी करत नाही व गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे.याला न्याय म्हणता येईल का? तसेच पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल सुद्धा कुणी घेत नाही.व गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत आणी मुग गिळून गप्प आहेत.याकडे सुद्धा आपण गांभीर्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे.तसेच सदर परिसरातील ठिकाणी गोरगरीब,वंचित,मागासवर्गीय घटकावर वारंवार अन्याय-अत्याचाराच्या घटनेमुळे परिसर हादरला आहे.तसेच पण गुन्हेगारीच्या घटना मौजपुरी,रामनगर व सेवली सर्कलमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यामुळे आपण याला आळा घालावा.तसेच ज्ञानेश्वर राठोड यांनी दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन न्याय द्यावा.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही ज्ञानेश्वर राठोड यांनी पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Previous articleयावल पंचायत समितीतील ग्रामीण पाणीटंचाई विभागाचे रविन्द्र देशमुख यांची तिन दशकांतर जामनेर येथे बदली
Next articleबाळापूर तालुक्यातील जानोरी मेळ येथील कोळी समाजातील बांधव ओबीसी समाजातील बांधव यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश