Home Breaking News मुक्काम आंदोलनाची सुरुवात करतातच महावितरणने दिले ट्रान्सफॉर्म ….!

मुक्काम आंदोलनाची सुरुवात करतातच महावितरणने दिले ट्रान्सफॉर्म ….!

120

 

जळगाव जा.:- महावितरण कार्यालय जळगाव जामोद येथे जळालेले ट्रान्सफॉर्म तात्काळ २ दिवसांमध्ये दुरुस्ती करून द्या ही मागणी युवा आंदोलक अक्षय पाटील व वडशिंगी,पाटण,तरोडा या गावातील शेतकऱ्यांनी केली होती.

त्याचे कारण असे की यावर्षी शेतकऱ्यांनी हरभरा,गहू,कांदा व इतर काही पिकाची लागवड चालू केलेली आहे. ज्या शेतकऱ्याकडे बोर,वीर आहे अशा शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यायला चालू केलेले होते.

परंतु अचानकपणे तरोडा शिवारातील डीपी व पाटण शिवारातील (बेंद्रे) डीपी ही पंधरा दिवसाच्या अगोदर जळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी द्यायची अडचन निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेले पिके सुकू लागले होते.

महावितरण कडे जळालेल्या डीपीची तक्रार करून व बिलाचे पैसे भरून सुद्धा पंधरा दिवसांपासून अधिकारी केवळ आणि केवळ वेळ मारुण द्यायचे.

तरोडा येथील शेतकरी व वडशिंगी येथील शेतकऱ्यांनी अक्षय पाटील यांना सांगितले असता आज दिनांक २ डिसेंबरला महावितरण कार्यालय जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांच्या वतीने ट्रान्सफॉर्म तात्काळ मिळावे याकरता मुक्काम आंदोलन ठेवले होते.

शेतकऱ्यांनी मुक्काम आंदोलनाची सुरुवात करतातच दोन्ही गावातील शेतकऱ्यांना तात्काळ ट्रान्सफॉर्म उपलब्ध करून दिले.

Previous articleबाळापूर तालुक्यातील जानोरी मेळ येथील कोळी समाजातील बांधव ओबीसी समाजातील बांधव यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश
Next articleमा.श्री.अशोक(आण्णा)पांगारकर विनम्र,अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!