Home Breaking News Gram Panchayat यावल तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी 41 तर सदस्य पदासाठी 223...

Gram Panchayat यावल तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी 41 तर सदस्य पदासाठी 223 अर्ज दाखल

469

 

Yaval वीकी वानखेडे

यावल तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह २९ प्रभागातील ७८ सदस्य निवडीसाठी १८ डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी गुरुवारपर्यंत सरपंच पदासाठी ४१ तर सदस्य पदासाठी २२३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

आज शुक्रवार दि. २ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी आज अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

यावल तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या न्हावी प्र यावल, चुंचाळे, पिळोदे बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द, चिखली बुद्रुक, कासारखेडे, चितोडा या आठ गावांसाठी आठ सरपंच पदासह २९ प्रभागातील ७८ सदस्य निवडीसाठी १८ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम दोन दिवस असताना गुरुवारी येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी उसळली होती.

सरपंच पदासाठी आज दि. २ डिसेंबर हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी एकुण ४१ अर्ज तर ग्राम पंचायत सदस्य पदासाठी २२३ अर्ज दाखल झाले आहेत. आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने यावलच्या तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांची व त्यांच्या गावातील कार्यकर्त्यांची एकच गर्दी उसळली होती.

यावल तालुक्यातील या आठ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका भुसंपादन विभागाच्या अधिकारी शुभांगी भारदे , फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आठ निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन कार्यभार सांभाळत आहे.

Previous articleमानधनिया दालमीलच्या डाळीच्या हौदात बालकामगाराचा अपघाती मृत्यू
Next articleजागतिक “दिव्यांग दिनानिमित्त” गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने शहरात रॅली आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन.