- अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.
चामोर्शी:-समग्र शिक्षा जिल्हा परिषद गडचिरोली,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली आणि गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा चामोर्शी येथील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक वृंद,शाळेतील सर्व विद्यार्थी-पालक,युवक, शहरातील नागरिक,गट समन्वयक तथा केंद्र प्रमुख हिम्मतराव आभारे,समावेशीत शिक्षण विशेषतज्ञ सुशील गजघाटे,संसाधन शिक्षक दशरथ गहाणे,जीवन शेट्टे,हिमदेव पिपरे,उमेश पोहाणे,रवी खेवले,कु मेघा कोहपरे,कु रिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चामोर्शी शहरातून वाजत-गाजत “जागतिक दिव्यांग दिवस” मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
तसेच ३ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत गट साधन केंद्राच्या वतीने चामोर्शी तालुक्यात “दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी” विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आणि उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.