Home चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाजावंडीचे उपक्रमशील शिक्षक एम.सी.बेडके “जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक” पुरस्काराने...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाजावंडीचे उपक्रमशील शिक्षक एम.सी.बेडके “जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित…!

308

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

एटापल्ली:- गडचिरोली जिल्ह्यात नुकतेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली च्या वतीने जिल्ह्यातील 14 उपक्रमशील आदर्श शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार दिनांक 29 नोव्हेंबर 2022 ला जिल्हा परिषद हायस्कुल गडचिरोली च्या भव्य सभागृहात आयोजित करण्यात आला.

जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्राथमिक विभागातील 12 व माध्यमिक विभागातील 2 असे एकूण 14 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

या पुरस्कार प्राप्त शिक्षकांपैकी श्री.एम,सी,बेडके हे एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाजावंडी या शाळेत कार्यरत आहेत.

त्यांनी आपल्या कारकिर्दीत शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करून शाळा डिजिटल केले व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले.शाळेची पटसंख्या 8 वरून 123 पर्यंत वाढवण्यात त्यांचा सिंहाची वाटा आहे.

एकेकाळी या शाळेत फक्त 8 विद्यार्थी शिक्षण घेत होते,ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती.पण बेडके यांनी अतिशय मेहनत करून या शाळेला पुनरुज्जीवन केले त्यामुळे आता या शाळेत 123 विद्यार्थी या शिक्षणाच्या आनंदवनात शिक्षण घेत आहेत.

अतिशय दुर्गम व नक्षलग्रत भागात पण मूलभूत सोयी सुविधा नसताना सुद्धा या शाळेला शिक्षणाचे आनंदवन तयार केले. या शाळेचे गुणवत्ता व इतर उपक्रमांचे या परिसरात चर्चा आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात 10 पेक्षा जास्त विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून या शाळेत प्रवेश घेतला.

ही पुरस्कार त्यांना मिळाल्याने त्यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली चे आभार मानले.बेडके यांनी पुरस्काराची श्रेय दीपक देवतळे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली,पुरकलवार शिक्षण विस्तार अधिकारी,शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,सदस्य,शाळेतील शिक्षक,विद्यार्थी व मित्रमंडळी याना दिले आहे.

Previous articleअकोला जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान दिव्यांगांच्या सर्वेक्षण कार्याची दखल राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सन्मान
Next articleदिव्यांगानी संघटिपणे संघर्ष केला नसता? माजीमंत्री बच्चुभाऊ गुहाटिला गेले नसते ?तर दिव्यांग मंत्रालय निर्मिती झाली नसती? दिव्यांगाना न्याय मिळाला नसता?