Home Breaking News जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामीण भागात पांढरे सोन्याची सर्रास चोरी

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामीण भागात पांढरे सोन्याची सर्रास चोरी

130

 

शेतकरी शेतामध्ये राबराब राबून पीक मोठे करतो, कष्ट घेतो, पैसा ओततो, दुसरीकडे मालाचे भाव पडतात अशातच जळगाव जामोद परिसरामध्ये या पिकवलेल्या पांढऱ्या सोन्याची अर्थात कापसाची रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन भुरटे सर्रास चोऱ्या करत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

महागाई वाढतच असताना आसमानी, सुलतानी संकटासोबत भुरट्या चोरांचे संकट जळगाव जामोद परिसरात निर्माण झाले आहे जळगाव (जा) तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी संतोष महादेव फाटे यांनी 3 डिसेंबर ला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की शेतातील कापूस वेचणीचे काम सुरू आहे

अशातच दुसऱ्या दिवशी सकाळी शेतामध्ये कापूस वेचणी करता गेलो असता अज्ञात व्यक्तीने अंदाजे 50 किलो कापूस अंदाजे किंमत 4000/- चोरून नेल्याचे निदर्शनास आले यावरून जळगाव जामोद पोलिसांनी कलम 379 नुसार गुन्हा नोंदविला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील आंबुलकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील करीत आहेत.

Previous articleदिव्यांगानी संघटिपणे संघर्ष केला नसता? माजीमंत्री बच्चुभाऊ गुहाटिला गेले नसते ?तर दिव्यांग मंत्रालय निर्मिती झाली नसती? दिव्यांगाना न्याय मिळाला नसता?
Next articleप्रा.डाॅ.बबन मेश्राम यांच्या जनसंवाद माध्यमे व सांस्कृतिक परीवर्तन पुस्तकाचे लोकार्पण