Home Breaking News सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिल्यामुळे एका 20 वर्षीय मुलीने केली आत्महत्या !

सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिल्यामुळे एका 20 वर्षीय मुलीने केली आत्महत्या !

485

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट : भेटायला न आल्यास सोशल मीडिया वरून बदनामी करू अशी धमकी दिल्याने एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

सदर तरुणी शहरातील महात्मा फुले वॉर्ड येथील रहिवासी असून नुकताच दि.२६ नोव्हेंबर रोजी तिचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला.

सदर घटना उघडकीस आल्यानंतर मृतक मुलीचा भाऊ रितिक किरण करोसिया मु. महात्मा फुले वार्ड ,स्वीपर कॉलनी याने हिंगणघाट पोलिसांत तक्रार केली असून आरोपी आदित्य गजराज महतो रा. रामनगर पांढराबोडी नागपूर, सनी गायकवाड रामबाग झाटूरली, नागपुर यांचे विरोधात पोलीसांनी भादंवी च्या कलम ३०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेतील आरोपी तसेच मृत तरुणीची ओळख असल्याने आरोपी नागपूरवरून तीला हिंगणघाट येथे भेटण्याकरिता यायचे.

घटनेपुर्वी आरोपी यांनी सदर तरुणीला भेटण्यास बोलविले होते, भेटावयास आली नाही तर व्हाट्सअप , फेसबुकच्या माध्यमातून तुझी बदनामी करू अशी धमकी आरोपींनी तीला दिली. बदनामीचे भीतीने तरुणीने उंदीर मारण्याचे औषध घेत आत्म हत्या केली होती.
यावेळी तरुणीची प्रकृती गंभीर झाल्यामुळे नागपूर येथे वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते.

या तरुणीचा दि. २६ नोव्हेंबर रोजी तिचा दुदैवी मृत्यू झाला.
घटनेतील आरोपी आदित्य महतो व सनी गायकवाड यास अटक करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत शुक्ला करीत आहे.

Previous articleप्रा.डाॅ.बबन मेश्राम यांच्या जनसंवाद माध्यमे व सांस्कृतिक परीवर्तन पुस्तकाचे लोकार्पण
Next articleकालखेड ची कन्या बनली PSI