(तुकाराम राठोड)
जालना-तालुक्यातील मौजपुरी येथील लक्ष्मीबाई माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी संदिप नारायण शामगिर याने शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये ५१ किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला असुन,त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
या यशा बद्दल त्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ.रमणताई बनकर,मुख्याध्यापक जयराम डुचे,अमोल बनकर,सरपंच भागवत राऊत,उपसरपंच आप्पासाहेब डोंगरे,ग्रा.प.सदस्य बंद्रीभाऊ भसांडे,सतिश ढोकळे,नारायण गायकवाड,बंडुभाऊ काळे,संतोष मोरे,राम जाधव,विष्णूपंत डोंगरे,माजी सरपंच निवृत्ती गायकवाड,दिपक डोंगरे,राजु महाडिक,सोनाभाऊ खडेकर,बालाजी बळप,बबन शामगिर,पै.अनिल काळे,पै.अर्जुन काळे,रामदास गायकवाड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.