Home वर्धा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा हिंगणघाट च्या वतीने संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा हिंगणघाट च्या वतीने संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

234

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा च्या वतीने वसंत सभागृहामध्ये जगनाडे महाराजांची 398 जयंती साजरी व भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कडून करण्यात आले .संतांना कुठली जात नसते धर्म नसते मानव कल्याणासाठी संत कार्य करीत असतात त्यांचे विचार अंगीकृत करणे हाच खरा माणूस धर्म आहे महाराष्ट्र संतांची भूमी आहे संताचे विचार साहित्य प्रेरणादायी आहे संतांनी कोणत्याही एका समाजापुरते आपले कार्य केले नसून संताचे कार्य हे संपूर्ण मानवजाती साठी आहे

संत तुकारामाचे सानिध्यात राहून संताजी महाराजांनी सुद्धा आपले अभंग रचले समाजाच्या दांभिकतेवर अंधश्रध्देवर टिका करून समाजाच्या अंधश्रद्धा दूर केल्या भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता जगनाडे महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा लेखणी बंद करून समाजापर्यंत पोहोचवली हे त्याचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य केले.

त्यात निमित्याने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाज यांनी संताजी जयंती साजरी करत भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले ह्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ माधुरी विहीरकर यांनी केले याप्रसंगी गिरीधर काचोळे यांनी स्वरचित संताजीचरित अभंगाचे.

गायन केले. कार्यक्रमाचे आभार जगदीश वांदीले यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ.माया चाफले ,महेश घुमड़े, प्रा. डॉ.राजू निखाडे प्रा डॉ. शरद विहीरकर राजेंद्र इखार ,सचिन येवले, अनिता गुंडे सुरेश गुंडे आदींनी सहकार्य केले.

Previous articleश्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
Next articleहिंगणघाट पुरग्रस्त आरक्षित जागेवर भुमीपुजन शिवसेनेकडून कार्यक्रमावर आक्षेप ?