Home जालना रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा !!

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा !!

159

 

Jalna(तुकाराम राठोड)

जालना-भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवेsantosh Danve यांच्या वाढदिवसानिमित्त जालना हॉस्पिटल येथे मोफत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोफत शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जालना हॉस्पिटल येथे करण्यात येत आहे.तरी आपणास विनंती की आपण या उद्घाटनास आवर्जून उपस्थित रहावे.

भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील बंधू आणि माता-भगिनींसाठी दिनांक १० ते १५ डिसेंबर या पंधरवड्यात मोफत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या मोफत शिबिराचा गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा.

आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी,असे आपणास आवाहन!आमदार संतोष पाटील दानवे यांनी केले आहे.

Previous articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जालना नगरपालिकेवर धडक मोर्चा:
Next articleगुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई जिल्यातील चोरीच्या मोटरसायकल व मोबाईल हस्तगत