Home वर्धा लोकशाहीर अन्नाभाऊ साठे उद्यान परिसर स्वच्छ करण्याची निवेदनाव्दारे मागणी

लोकशाहीर अन्नाभाऊ साठे उद्यान परिसर स्वच्छ करण्याची निवेदनाव्दारे मागणी

177

गुड्डू कुरेशी सिंदी रेल्वे

किशोर वरघने यांचे नेतृत्व

सिंदी रेल्वे ता.९ : शहरातील वार्ड क्रमांक १२ मधील पालीकेच्या जागेवर दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत लोकशाहीर अन्नाभाऊ साठे उद्यानाची निर्मीती करण्यात आली.

मात्र या उद्यानाच्या स्वच्छतेकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने परिसरात घानीचे साम्राज्य पसरले असुन नवनिर्मीत उद्यांनाचे विद्रुपीकरन झाले आहे. यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते किशोर वरघने यांचे नेतृत्वात परिसरातील नागरीकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन सोमवारी (ता.५)पालिकेचे मुख्याधिकारी सतिश शेवदा यांना देऊन ताबडतोब या परीसराची साफसफाई करुन स्वच्छता करण्यात यावी.

सोबतच सरकारी लाखो रुपये खर्चून बांधलेल्या वास्तूची देखभाल करने पालिकेचे काम असुन याकडे नियमित लक्ष देऊन कर्तव्य करावे अशी मागणी करण्यात आली.

दिलेल्या निवेदनावर परिसरातील महेंद्र मडलीक, विशाल खंडाळे, मारोती शंभरकर, संदीप आगलावे, दामोधर फुलकर, देविदास वरजे, किशोर ब्राम्हने, सुरेखा साखरकर, रुपाली डोफे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Previous articleगट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे मोरगाव भाकरे येथील व सर्व ग्रामीण भागात गोवंश प्रमाण वाढलेला आहे तरी सर्व गावकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना.धोंडी सुद्धा दिली आहे
Next articleअकोल्यात अतिक्रम हटवा मोहीम