Home अकोला अकोला नवनिर्वाचित जि. प. सभापतींचा पदग्रहण सोहळा संपन्न

अकोला नवनिर्वाचित जि. प. सभापतींचा पदग्रहण सोहळा संपन्न

213

 

Akola प्रतिनिधी अशोक भाकरे

वंचित बहुजन आघाडीची सत्ता असलेल्या अकोला जिल्हा परिषदेच्या चार नवनिर्वाचित जिल्हा परिषद सभापतींचा आज दि. १२/१२/२०२२ रोजी दुपारी १२:३० वाजता स्थानिक जिल्हा परिषद येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे यांच्या अध्यक्षतेखाली पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

या पदग्रहण सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला प्रदेश महासचिव सौ. अरूंधतीताई शिरसाट, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्रभाताई शिरसाट, जि. प. अध्यक्ष सौ संगीताताई अढावू, जि. प. उपाध्यक्ष सुनिल फाटकर, माजी जि. प. अध्यक्ष तथा जि. प. सदस्य सौ. पुष्पाताई इंगळे, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, महिला जिल्हा महासचिव सौ. शोभाताई शेळके, जेष्ठ नेते मनोहरराव पंजवाणी, बळीरामजी चिकटे, अशोकराव शिरसाट, प्रतिभाताई अवचार, महानगर अध्यक्ष सौ वंदनाताई वासनिक, महिला जिल्हा महासचिव निलोफर शहा, माजी सभापती आकाश शिरसाट, राहुलजी अहिरे, महानगर अध्यक्ष कलिम खॉ. पठाण, किशोर जामणिक, नितेश किर्तक, संजय हिवराळे, अमोल शिरसाट, अमोल जामणिक, निताताई गवई, प्रमोदिनी कोल्हे, लिनाताई शेगोकार, राम गव्हाणकर, शंकरराव इंगळे, मोहन तायडे, रतन आडे, चरण इंगळे, देवराव राणे, सुनिल सरदार, राजेश वावकार, अजय शेगावकर, वसंतराव नागे, सुशील मोहोळ यांच्यासह सर्व जि. प. सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी व तालुकाध्यक्ष मंचावर उपस्थित होते. जिल्हा परिषदेवर ज्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपुर्ण बहुमतात आपण काबीज केली.

त्याच प्रमाणे जिल्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती ह्या वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात घेण्यासाठी सर्व पदाधिकार्यांनी कामला लागा असे आवाहन पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेले जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे यांनी केले. समाजकल्याण सभापती सौ. आम्रपालीताई खंडारे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन शे मुक्तार, शिक्षण सभापती सौ. मायाताई नाईक, कृषी सभापती सौ योगीताताई रोकडे यांचा सत्कार या सोहळ्यात उपस्थित पदाधिकार्यांच्या वतीने करण्यात आला.

सत्कार सोहळ्याचे सुत्रसंचलन माजी तालुकाध्यक्ष दिनकरराव खंडारे यांनी तर प्रास्ताविक मनपा गटनेते गजानन गवई यांनी केले व उपस्थितींचे आभार विकास सदांशिव यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातुन बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleमा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व ओबीसी सेल यांच्याकडून वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
Next articleGopinath munde गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेला संघर्ष कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे,भाजपाचे ज्ञानेश्वर शेजुळ यांनी व्यक्त केली भावना