Home Breaking News अकोला ग्रा.पं. निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

अकोला ग्रा.पं. निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

159

 

प्रतिनिधि अशोक भाकरे अकोला

अकोला दि.१३ जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी येत्या १८ तारखेला मतदान होणार आहे.

त्या पार्श्वभुमिवर निवडणूक यंत्रणेचा पूर्वतयारीचा आढावा आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, पोलीस उपअधीक्षक नितीन शिंदे, सहा. पुरवठा अधिकारी संतोष शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मतदान पूर्व तयारी.

मतदान यंत्रे, (बॅलेट युनिट कंट्रोल युनिट इ.), मतदान केंद्रांवरील सोई सुविधा, संवेदनशील मतदान केंद्र, आवश्यक पोलीस बंदोबस्त, वाहन व्यवस्था, मतदान यंत्रे ठेवण्यासाठी निर्धारीत केलेल्या स्ट्रॉंग रुम इ. सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला.

यासंदर्भात सर्व यंत्रणांनी समन्वय राखून सुव्यवस्थितपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी यंत्रणांना दिले

Previous articleशेतकरी संघटनेचे देवकृपा लॉन्स मंगल कार्यालय घोडेगाव फाटा ता.जि.जालना येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला:
Next articleसेवा निवृत्त शिक्षक शेतकऱ्याचा केळीचा माल जम्मू काश्मीरला रवाना.