Home Breaking News सेवा निवृत्त शिक्षक शेतकऱ्याचा केळीचा माल जम्मू काश्मीरला रवाना.

सेवा निवृत्त शिक्षक शेतकऱ्याचा केळीचा माल जम्मू काश्मीरला रवाना.

455

 

विकी वानखेडे  यावल

याबाबत प्राप्त माहिती अशी की यावल तालुक्यातील वड्रा येथील से.नि शिक्षक यांनी आपल्या पेन्शनच्या भरोवश्यावर न राहता स्वतः शेतकरी म्हणून केळी पिकाची लागवड केली. आणि त्याची मशागत करून त्यांनी उत्कृष्ट दर्जाचे केळीचे उत्पादन घेतले व त्या केळीची विक्री काश्मीरला रवाना केल्याचे समजते.

यावल तालुक्यातील वर्डी गावचे सेवानिवृत्त शिक्षक धनंजय शेणू पाचपोळ यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली त्यांच्याजवळ स्वतःची शेती असल्याने ते सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शनच्या भरोश्यावर न राहता शेतकरी म्हणून त्यांनी शेती करून आपल्या शेतात केळीची शेती करून मशागत केली आणि उत्कृष्ट केळीचे उत्पादन घेतले. यावर्षी त्यांच्या बागास पहिल्या वेळेस १३५०/-रुपये तर दुसऱ्या गाडीला १९००/- रुपये भाव मिळून आज दि. १४/ डिसेंबरला तिसऱ्या गाडीला २२००/-रुपये चा भाव मिळाला असून हा माल रावेर येथील व्यापारी मोंटी शेठ यांनी खरेदी करून तो माला जम्मू-काश्मीरला रवाना केला आहे .विशेष म्हणजे त्यांनी प्रति टन काट्यावर त्यांना ऑनलाईन पेमेंट केल्याचे समजते.

Previous articleअकोला ग्रा.पं. निवडणूक पूर्वतयारीचा आढावा
Next articleसमग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचा विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर अधिवेशनावर “महामोर्चा” धडकणार.