Home Breaking News लग्न मंडपातून घरी आणून लेकीला फासावर चढविले:

लग्न मंडपातून घरी आणून लेकीला फासावर चढविले:

1066

 

(तुकाराम राठोड)

जालना-गावातील एका मंदिरात मुलीच्या लग्नाची तयारी झाली; पण लग्नापूर्वीच अर्धा एकर जमीन मुलीच्या नावे करण्यावरून बिनसले. संतापलेल्या वडील व काकांनी मुलीला मंडपातून ओढत घरी आणले.

बदनामीच्या रागातून त्या दोघांनी मुलीच्या गळ्याला दोर बांधून घराजवळच्या लिंबाच्या झाडावर लटकवले.

दोघांनीच सरण रचून तिचा मृतदेह जाळला. राख दोन पोत्यात भरून ठेवली. हृदय पिळवटून टाकणारी ही ऑनर किलिंगची घटना जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव येथे बुधवारी उघडकीस आली. ज्या ठिकाणी मृतदेह जाळला होता, तेथे रांगोळी काढल्याचे दिसून आले आहे.

Previous articleभाजपा भटके विमुक्त आघाडीचे नागपूर येथे २२ डिसेंबर रोजी राज्यव्यापी अधिवेशन-मा.आ. नरेंद्र पवार.
Next articleयावल तालुका हादरला : बोरावलला शेतात जमिनीत पुरलेला हात बॉम्ब निंदणी करतांना फुटला ; महिला गंभीर जखमी