Home Breaking News यावल  तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता शनीवारी निवडणूक साहित्यासह कर्मचारी रवाना झाले.

यावल  तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता शनीवारी निवडणूक साहित्यासह कर्मचारी रवाना झाले.

450

 

यावल विकी वानखेडे  

यावल तहसील कार्यालयात कर्मचार्‍यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. आठ ग्रामपंचायतीच्या 35 बुथमध्ये रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल.

सरपंच पदाकरीता 28 तर 52 सदस्य पदाकरीता 136 उमेदवार रींगणात असून सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणी होईल.

या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक, कासारखेडा, न्हावी, चुंचाळे, पिळोदा बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द व चितोडा या आठ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे.

या निवडणुकीत पिळोदा बुद्रुक ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचासह सात ग्रामपंचायतीमधून 26 सदस्य माघारीत बिनविरोध ठरले होते तर उर्वरीत सात ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदाकरीता 28 तर 52 सदस्यापदाकरीता 136 उमेदवार रींगणात आहेत.

आठ ग्रामपंचायतीत रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल.

सोमवारी हाती येणार निकाल निवडणुकीसाठी तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी हनीफ तडवी, बबीता चौधरी, एस.एल. पाटील, सचिन जगताप, एन.पी.वैराळकर, एम.पी.देवरे, शेखर तडवी आदी लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, सोमवार, 19 रोजी सकाळी 10 वाजेपासून तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरवात होईल.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी यावलचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाची तुकडी बंदोबस्तासाठी नेमण्यात आली आहे

Previous articleयावल तालुका हादरला : बोरावलला शेतात जमिनीत पुरलेला हात बॉम्ब निंदणी करतांना फुटला ; महिला गंभीर जखमी
Next articleअकोला होमगार्ड जिल्हा कार्यालयात उजळणी प्रशिक्षण शिबिर संपन्न..