Home Breaking News कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक

कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक

129

 

कोल्हापूर/तानाजी कुऱ्हाडे

१८ डिसेंबर कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत मतदानासाठी मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त व शांततेत होत असल्याचे दिसत आहे. २०२२ ते २०२७ पंचवार्षिक ग्रामपंचायत थेट सरपंच पदासाठी जनतेतून निवड होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक मध्ये सरपंच व सदस्यांना(उमेदवार) यांना काही पक्षातून पाठिंबा साथ मिळत आहे. तर काही उमेदवार आपल्या स्वतःच्या स्वबळावर लढत आहेत

. ग्रामपंचायतमधील आजी – माजी सरपंच,सदस्य व नवीन उमेदवार काही ठिकाणी दिसत आहेत. तर काही उमेदवार आपल्या जागेवर एका ठिकाणी आपल्या गावातील मतदार यांचे आभार मानताना दिसून येते आहेत.

मतदार यांचे मतदानासाठी मतदान केंद्रावर महिला, पुरुष व युवा यांची गर्दी लांबपर्यंत रांगेत उभे तर काही ठिकाणी कमी संख्या मधे मतदार आपल्या हक्काचे मत देण्यासाठी दिसत आहेत. मंगळवार दिनांक २० डिसेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर होणार आहे.

आता आजी – माजी सरपंच व सदस्यांची ओढ निकालाकडे.

 

Previous articleजिल्हाध्यक्षपदी गजानन खंडाळे यांची नियुक्ती
Next articleअवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्यास अटक