Home Breaking News हिंगणघाट नगरपरिषद मधील भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक !

हिंगणघाट नगरपरिषद मधील भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक !

399

 

प्रतिनिधी सचिन वाघे

दि.20 डिसेंबर
हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून
माजी नगराध्यक्ष सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवक यांनी. लोकनियुक्त सरकार नसल्यामुळे हिंगणघाट नगरपालिका मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेराव घातला व नगरपालिकेतील कर्मचारी यांच्याकडून भ्रष्टाचार संबंधित विषयावर प्रश्न उपस्थित केला ?

प्रत्येक विभागातील पदाधिकारी कर्मचारी यांच्यावर कुणाचाही अंकुश नाही मागील ब-याच दिवसांपासून हिंगणघाट नगरपरिषद मध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. नगरपरिषदमधील प्रत्येक विभागांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.

संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी . यावेळेस नगरपरिषद मधील बांधकाम विभाग, स्वास्थ्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, करविभाग,दाखल खारीज प्रकरणे, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना या सर्वच विभागामध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठल्याने सर्वसामान्य हिंगणघाटकरांना होत असलेल्या मनस्ताप आणि आर्थिक दंडाबाबत कर्मचाऱ्याकडून पैशाची मागणी सबंधित खुलासा करण्यात आला

.यावेळी दाखल खारीज प्रकरणामध्ये जमदाडे नामक कर्मचाऱ्याने १५०००/-रुपये लाच मागीतल्याचा आरोप सर्वांसामोर प्रशांत अनंतराव बाकडे यांचे वतीने करण्यात आला.

यावेळी सुरेश मुंजेवार माजी नगराध्यक्ष,निलेश ठोंबरे माजी नगराध्यक्ष, आफताभ खान माजी नगरसेवक ,निलेश ठोंबरे माजी नगराध्यक्ष, हरीदासजी काटकर माजी नगराध्यक्ष,
विठ्ठल गुळघाणे माजी नगरसेवक, ,धनंजय बकाने माजी नगरसेवक, अनिल भोंगाडे माजी नगरसेवक, विनोद झाडे माजी नगरसेवक, दिपक माडे माजी नगरसेवक, राजेश धनरेल माजी नगरसेवक, राजेश भाईमारे माजी नगरसेवक, जनार्दन तुमाने माजी नगरसेवक, बालाजी गहलोद माजी नगरसेवक,नरेंद्र थोरात , पांगुळ सर, डॉ निर्मेशजी कोठारी, हरीश काळे, विजय तामगाडगे, संजय कातरे, , विक्रांत भगत, जितेंद्र सेजवल, , सुरेंद्र टेंभुर्णे राजु रूपारेल,लिलाधर मडावी,नितेश नवरखेडे, अंकुश कुचनवार, सुर्यकांत तिजारे, गजानन पिसे, प्रमोद गोहणे, रवी काटवले,राजु खांडरे, पंकज पाके, शुभम चव्हाण, अमित गावंडे, प्रविण काळे, रमजान शेख, नरेश पंपनवार, संजय कावळे,सतिश खोंडे, अशोक पवनीकर, दिगांबर नवघरे, बंडु काटवले, आशिष हरबुडे, गव संतोष माथनकर व मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हर्षल गायकवाड मुख्याधिकारी
:- सुधीर कोठारी माजी नगराध्यक्ष यांच्या नगरपालिकेतील प्रत्येक विभागातील भ्रष्टाचार सबंधित आक्षेप वर प्रतिक्रिया घेताना प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली यादरम्यान त्यांनी सांगितले की लवकरच प्रशासकीय अधिकारी यांना आदेश नगरपालिकेत प्रत्येक विभागात 3,4 वर्षापासून असलेले कर्मचारी यांच्या जागा बदली करण्यात येणार आहे, तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख सुद्धा बदलण्यात येणार आहे , तसेच भ्रष्टाचार बाबत कोणी पैशाची मागणी केल्यास माझ्याशी संपर्क करावा

Previous article८ ग्रामपचांयतीच्या निवडणुकीत ८ सरपंच पद ८ व सदस्य ७८ जागा यापैकी काही जागा बिनविरोध
Next articleखुर्सापार चा संघ विजेता तर पळसगावचा संघ उपविजेता