Home Breaking News विषारी सापाने दंश केल्याने नावरे गावातील तरूण शेतमजुराचा दुदैवी मृत्यु

विषारी सापाने दंश केल्याने नावरे गावातील तरूण शेतमजुराचा दुदैवी मृत्यु

480

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील यावल चोपडा मार्गावरील नावरे गाव फाटया जवळच्या शेतात विषारी सर्पदंश झाल्याने तरूण शेतमजुराचा मृत्यु झाल्याची घटनासमोर आली असुन. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की .

सुनील भिमसिंग पाटील वय४२ वर्ष राहणार नावरे तालुका यावल हा तरूण शेतमजुरकरणारा तरुण दिनांक २१डिसेंबर बुधवार रोजी सायंकाळच्या सुमारास पन्नालाल चम्यालाल जैन यांच्या वढोदे शिवारातील शेतात गुरांना कडबाचारा आणण्यासाठी गेला होता ,

मयत पाटील हे जैन यांच्या गावापासुन एक किलोमिटर लांब असलेल्या नावरे फाट्याजवळच्या शेतात गेला असता तो उशीरापर्यंत घरी न आल्याने मयताची बहीण त्यास शेतात पाहण्यासाठी गेली

असता शेताच्या बांधावर सुनिल पाटील हा मृत अवस्थेत आढळ्रन आला त्यामुळे त्यास विषारी सापाने दंश केल्याने त्याचा दुदैवी मृत्यु झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत होते ,

मयत सुनिल पाटील यांचा मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असुन त्यास डाव्या हाताला विषारी सापाने सर्पदंश केल्याने मरण पावल्याचे शवविच्छेदनातुन निष्पन्न झाले, याबाबत हिम्मत बाबुराव पाटील वय४० वर्ष राहणार नावरे यांनी खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन

, पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे व पोलीस हॅड कॉस्टटेबल संजय देवरे पोलीस करीत आहे .

Previous articleश्री साई मंदिर नंदोरी रोड हिंगणघाट येथे रामकथेचे आयोजन.
Next articleदै.अजिंक्य भारत च्या शिलेदाराचा गौरव अकोला (वा) अल्पवधीत यशोशिखरावर गाठणाऱ्या व ग्रामिण भागाचा अग्रगण्य दैनिक असलेल्या शिलेदाराचा आज अकोला कार्यलयात सत्कार करण्यात आला.