Home बुलढाणा सावली सेवा प्रकल्पाच्या वर्धापनदिनी विजयबाप्पु देशमुख यांच्या वतीने अंध बांधवांना किराणा किट...

सावली सेवा प्रकल्पाच्या वर्धापनदिनी विजयबाप्पु देशमुख यांच्या वतीने अंध बांधवांना किराणा किट व ब्लॅंकेट वाटप

221

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: सावली सेवा प्रकल्पाच्या आठव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन आपल्या संत नगरीचे समाजभुषण विजयबाप्पु देशमुख यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र संजय व अंकुश यांच्या शुभहस्ते प्रकल्पातील तथा परीसरातील मोठ्या संख्येने उपस्थित अंध बांधवांना महिनाभर पुरेल अशी किराणा साहित्य किट तथा थंडीपासुन संरक्षणार्थ ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

सदर सुंदर कार्यक्रमाला प्रकल्पातील दिव्यांग ज्ञानेश्वर याने या जन्मावर जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले याप्रसंगी डॉ गजानन मुंढे सर यांनी अध्यक्षीय भाषणातुन संजय व अंकुश देशमुख यांचे सदर उपक्रमाबद्दल कौतुक केले प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी प्रकल्पाविषयी माहिती देऊन वर्धापनदिनाचे महत्व सांगितले

याप्रसंगी दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य व ब्लॅंकेट घेऊन अतिशय आनंद झाला

Previous articleबुलडाणा उपजिल्हाधिकारी, भिकाजी घुगे लिपिकसह एका वकिलाला एक लाखाची लाच स्वीकारतांना बुलडाणा एसीबीने केली अटक
Next articleकिनगाव येथील नेहरू विद्यालयात सैन्यदलात भरती झाल्याबद्दल मंगेश पाटील यांचा संन्मान.