Home Breaking News ग्रा प सदस्य पतीने खुर्ची मारून सरपंचास जखमी केले

ग्रा प सदस्य पतीने खुर्ची मारून सरपंचास जखमी केले

134

 

शेगाव : विकास कामाच्या माहिती मागण्याच्या कारणावरून वाद
ग्रामपंचायत सदस्य पतीने सरपंचास खुर्ची मारून जखमी केल्याची घटना तालुक्यातील श्री क्षेत्र नागझरी येथे बुधवारी घडली.

याबाबत असे की,नागझरी येथील
सरपंच गणेश रामभाऊ खरप वय 47 व ग्रा प सदस्य पती संतोष देविदास पवार हे ग्रामपंचायत कार्यालयात गावातील इतर लोकांसह घरकुल योजना संबंधी चर्चा करत असताना, पंधराव्या वित्त आयोगाची माहिती मागत होता.

त्यावर सरपंच खरप यांनी आरोपीला सध्या घरकुलाची चर्चा चालू आहे. इतर माहिती तू नंतर माग असे म्हटले असता, आरोपीने ग्रामपंचायत कार्यालयातील प्लास्टिक खुर्ची सरपंचांचे डोक्याला मारून जखमी केले.

याबाबत सरपंच खरप यांनी पो स्टे ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तसेच संतोष पवार यांनी ही सरपंच खरप विरोधात तक्रार दिली असून पुढील शहर पोलीस तपास करत आहेत.

Previous articleगांधीग्राम पुलासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला आले यश
Next articleजेईएस महाविद्यालयात राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन: