Home जळगाव किनगाव इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूल येथे दि.३० व ३१ रोजी तालुकास्तरीय...

किनगाव इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूल येथे दि.३० व ३१ रोजी तालुकास्तरीय क्रिडास्पर्धा.

329

 

यावल (प्रतिनीधी) विकी वानखेडे

यावल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२२-२३
दि.३० व ३१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ८ ते स्पर्धा संपेपर्यंत डोणगाव किनगाव रोडवरील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुल किनगाव येथे होणार आहेत.

महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगांव अंतर्गत यावल तालुकास्तरीय,पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अधिकारी,कर्मचारी व
शिक्षक यांच्यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम खालील प्रमाणे असणार आहेत

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी ओळखपत्राच्या फोटोवर सही व शिक्का असलेले परिपूर्ण माहिती भरलेले ओळखपत्र आवश्यक आहे.

सकाळी ८ वाजता ज्या खेळात सहभागी आहे त्या स्पर्धेत सहभाग घेतल्याबाबत संम्बधीत टेबल वर रिपोटींग करावी अन्यथा आपण गैरहजर आहे असे समजण्यात येईल.

खेळाडू स्पोर्ट्स किट (गणवेश) मध्येच असले पाहिजे यात पुरूषांनसाठी हाफ पॅट टी शर्ट तर महीला खेळाळूंनसाठी पंजाबी ड्रेस (पांढरा असल्यास चांगले राहिल)
स्पर्धेत येतांना सोबत एक वेळेचा पुरेसा जेवणाचा डबा सोबत आणावा तसेच.

खेळाडूंनी सदर स्पर्धेत कोणतेही मद्म सेवन करून आल्यास स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार नाही इ.नियम पाळणे खेळाळूंना बंधन कारक राहील असे सौ.मंजुश्री गायकवाड मॅडम गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी -१) तथा
क्रीडा समिती अध्यक्ष यावल एन.के.शेख गटशिक्षणाधिकारी तथा सचिव क्रीडा समिती यावल शिक्षण विभाग यावल, मुख्याध्यापक श्री.के.यु.पाटील समन्वयक क्रीडा समिती यावल.यांनी सांगीतले.

Previous articleशालेय क्रीड़ा स्पर्धेत महेश ज्ञानपीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी नवा विक्रम नोंदवीला
Next articleधक्कादायक-मृत्युनंतरही सुरु होते उपचार,जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु: