Home वर्धा आमदार समीर कुणावार यांचा वाढदिवसा निमित्त विदर्भ स्तरीय वकृत्व स्पर्धा

आमदार समीर कुणावार यांचा वाढदिवसा निमित्त विदर्भ स्तरीय वकृत्व स्पर्धा

423

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय आमदार समीर कुणावार यांचा वाढदिवस १ जानेवारी ला आहे वाढदिवसाच्या औचित्याने दिनांक २ जानेवारी ला विदर्भ स्तरीय वकृत्व स्पर्धा व सत्कार समारंभ च आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत वर्धा, अमरावती नागपूर, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यातील विविध वक्ते यांची नोंदणी झाली आहे कार्यक्रमाचं आयोजन सनी बासनवार मित्र परीवार तर्फे करण्यात आला आहे.

तसेच हिंगणघाट शहरातील वृक्ष चळवळ संघटना वृक्षमित्र परीवार, सामाजिक संघटना मा. भवानी बहुद्देशीय सामाजिक संघटना व हिंगणघाट शहरातील फुटबॉल खेडाळु मुस्तफा बक्क्ष याचा सुद्धा सत्कार संमारभ होणार आहे,

कार्यक्रम उद्घघाटन माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे, माजी नगरसेविका अर्चना कुबडे माजी नगरसेविका वैशाली सुरकार माजी नगरसेवक नरेश युवनाथे यांचा उपस्थित सकाळी १० ला होणार आहे,

तसेच बक्षीस वितरण समारंभ प्रेम बसंतानी माजी नगराध्यक्ष किशोर दिघे जिल्हा महामंत्री अंकुश ठाकरे प्रदेश सचिव भाजयुमो अशोक पिट्टलवार अध्यक्ष पद्मशाली समाज हिंगणघाट यांचा प्रमुख उपस्थित दुपारी ३.३० ला शितला माता मंदिर जुनी वस्ती येथे पार पडणार आहे…

Previous articleयावल : यावल नगरपरीषदेचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांची ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगरपरीषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
Next articleशेख रसूल शेख महंमद यांची आझाद, हिंद शेतकरी संघटनेचे जळगाव जा,तालुका अध्यक्ष पदी निवड,!!.