Home वर्धा हिंगणघाट केसरी कुस्ती स्पर्धा 2022 मानकरी..!अंकुश वाळके,(वाशिम)

हिंगणघाट केसरी कुस्ती स्पर्धा 2022 मानकरी..!अंकुश वाळके,(वाशिम)

215

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- लालाजी आखाडा व स्वराज्य फाउंडेशन द्वारा आयोजित स्व. तुकारामजी धोटे तसेच स्व. अंबादासजी गावंडे स्मृती प्रित्यर्थ हिंगणघाट केसरी कुस्ती स्पर्धा 2022 चा आयोजन २७/२८ डिसेंबर ला स्थळ लालाजी आखाडा मैदान मासाहेब जिजाऊ चौक निशानपुरा वॉर्ड हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे करण्यात आले होते.

४५ किलो वजन गटात रोहित गौरकार, चंद्रपूर,५१ किलो वजन गटात अर्जुन यादव,अमरावती,५७ किलो वजन गटात शाहबाझ खान, चंद्रपूर, ६३ किलो वजन गटात हितेश सोनवणे, चंद्रपूर,७० किलो वजन गटात गोविंद कपाटे, अमरावती, हे विजेते ठरले.

अंकुश वाळके,(वाशिम) हा कुस्ती पटू हिंगणघाट केसरी कुस्ती स्पर्धा 2022 चा मानकरी ठरला. कार्यक्रमाची सुरवात डॉ. निर्मेशजी कोठारी यांच्या शुभहस्ते शिवछत्रपतींच्यां पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आले.

हिंगणघाट केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेत्याला ऍड. सुधीरबाबूजी कोठारी यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन अमित गावंडे व मित्र परिवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मुडे व आभार प्रदर्शन देवा शेंडे यांनी केलं. मोठ्या संख्येने क्रीडा प्रेमींनी देखील या कार्यक्रमात उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहिन दिले.

Previous articleमहसूल विभागाची वाळु माफ्यावर कारवाई
Next articleघरकुल योजनेचे निकष बदलवून ओबीसींसाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवा