Home अकोला अकोला येथे वेदांत मुंदाने ह्यांची सप्त खंजिरी निनादनार

अकोला येथे वेदांत मुंदाने ह्यांची सप्त खंजिरी निनादनार

275

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कृषी क्रांतीचे शिल्पकार डाॅ.पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांची जयंंती व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर मावंद कार्यक्रम तसेच वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त श्री संत अंबादास महाराज विश्वस्त मंडळ श्री क्षेत्र कान्होली भक्त मंडळी यांच्या तर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

१ जानेवारी ते ८ जानेवारी पर्यंत दररोज सकाळी ९ते १२ वाजे पर्यंत तसेच दुपारी ३ ते ६ वाजे पर्यंत भागवताचार्य ह.भ.प शरद महाराजजी गुल्हाने यांचा श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह सुरू असून परिसरातील अनेक भाविक भक्त या भागवत कथा श्रवणभक्तीचा लाभ घेत आहे.

४ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८ वाजता महाराष्ट्र भूषण, सुप्रसिध्द सप्तखंजेरीवादक , राष्र्टीय कीर्तनकार ,समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराजांचे शिष्य वेदांत मुंदाने ह्यांचा जाहीर सप्त खंजेरीवर समाजप्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे .

वेदांत मुंदाने सप्त खंजिरीच्या माध्यमातून अज्ञान , अंधश्रद्धा, वाईट परंपरा, जातीप्रथा, याविषयी समाज प्रबोधन करुन समाज परीवर्तन करण्याचे मोलाचे कार्य करतात .

कृषी क्रांतीचे शिल्पकार डाॅ.पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांची जयंंती व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर मावंद कार्यक्रम व वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त होणाऱ्या प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संत अंबादास महाराज विश्वस्त मंडळ शिव मंदीर तुकाराम हाॅस्पिटल च्या मागे माधव नगर अकोला येथे करण्यात आले आहे.

Previous articleपहली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले
Next articleक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती “बालिका दिन” म्हणून साजरी