Home जालना साविञीच्या लेकिंनी साजरी केली साविञीबाई फुलेची जयंती…!

साविञीच्या लेकिंनी साजरी केली साविञीबाई फुलेची जयंती…!

181

 

(तुकाराम राठोड)

जालना-साविञीबाई “प्लेगयोध्दा”म्हणून लढल्या.अन
जालना जिल्हातील चक्रवर्ती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजिक पांगरी संचलीत राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना.या शाळेच्या प्रांगणामध्ये आज ०३/०१/२०२३ रोजी क्रांती ज्योती साविञीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमांचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे.सी.जी.यांच्या हस्ते ज्ञानाई साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहूने गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.”साविञीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला”.या प्रसंगी सर्व शिक्षक तसेच विद्यार्थीं व विद्यार्थींनी आपली मनोगत व्यक्त केले व सुंदर असे अभिनय एकांकीका,नाटीका,भाषणे,कविता सादर केले.

तसेच विद्यालयांतील सर्व महिला शिक्षकांनी आज सन्मानाने व्यासपिठावर बसवुन कार्यक्रम माहिला शिक्षकांनीच प्रतिनिधीत्व करण्यास संधी दिली.यांत जेष्ठ शिक्षीका श्रीमती.एस.आर.कुलकर्णी यांनी

विद्यार्थांना मार्गदर्शन केले.व तसेच आर.एस.ठाकरे.यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.व शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे.विद्यार्थांना मार्गदर्शन केले.पुढे ते म्हणाले की, साविञीबाई फुले “प्लेगयोध्दा”म्हणुन लढल्या व त्यांनी व तसेच देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करण्यारा साविञीबाई फुलेचा संघर्ष सोपा नव्हता.

व श्रीमती.ए.बी.देशपांडे यांनी सुंदर असे सुञसंचालन व आभारप्रदर्शन केले.यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.एस.आर.कुलकर्णी,वाय.बी.मदन,डी.एन.सोनकांबळे,पी.पी.नागरे,ए.बी.देशपांडे,एल.बी.जाधव,आर.एस.ठाकरे,एस.बी.राऊत,एम.ए.खरात आदिची उपस्थिती होती.

Previous articleक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती “बालिका दिन” म्हणून साजरी
Next articleराष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी