Home जळगाव मसाकाच्या आवारातील बेकायदेशीर लाखो रूपयांच्या वृक्षांची कत्तल व्यवस्थापकावर कायद्याशीर कारवाईची मागणी

मसाकाच्या आवारातील बेकायदेशीर लाखो रूपयांच्या वृक्षांची कत्तल व्यवस्थापकावर कायद्याशीर कारवाईची मागणी

624

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील न्हावी ( फैजपुर ) येथील मधुकर साखर कारखाना आवारातील लाखो रुपयांच्या वृक्षची बेकायद्याशीर तोड सावखेडा सिम येथील ऊस उत्पादक शेतकरी व सामाजीक कार्यकर्त विजय प्रेमचद पाटील यांनी फैजपुर विभागाचे प्रांतअधिकारी कैलास कडलग , यावलचे तहसीलदार महेश पवार आणी वनविभाग पूर्वचे विक्रम पदमोर यांना लिखित निवेदन देऊन देखील कोणतीही संबंधित व्यवस्थापक व ठेकेदारांवर कारवाई होत.

नसल्यामुळे फैजपूर चे माजी नगराध्यक्ष पिंटू भाऊ राणे व यावल कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तुषार पाटील ( . मुन्ना भाऊ ) नावरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच समाधान पाटील, ललित चौधरी व अन्य कार्यकर्ते यांनी आज ३ जानेवारी २०२३ रोजी तहसीलदार महेश पवार यांची भेट घेऊन संबंधितांवर आज पर्यंत कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला मधुकर सहकारी साखर कारखाना येथील चाळीस ते पन्नास वर्षापासून वेगवेगळ्या प्रजातीचे वृक्षारोपणाद्वारे झाडे लावण्यात आली होती त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन करून त्यांना मोठे करण्यात आले होते.

मधुकर सहकारी कारखाना येथील कार्यरत असलेल्या व्यवस्थापकांनी कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता ते ४० ते ५० वर्षांपूर्वीचे जुने वृक्ष त्यांची परस्पर विल्हेवाट लावताना दिसत आहे यात शासनाचे व कारखान्याचे तसेच पर्यावरणाचे फार मोठे नुकसान झालेले आहेत यावल येथील तहसीलदार महेश पवार यांना माजी नगराध्यक्ष निलेश राणे ( पिन्टू राणे ) फैजपूर यांनी तहसीलदारांची भेट घेत त्यांना या विषयाशी अवगत केले ,

मधुकर कारखान्याच्या आवारातील सुमारे ४० ते ५० वर्षापासूनचे जुने व जिवंत वृक्ष असून, संबंधीत व्यवस्थापकाने कोणचीही परवानगी न घेता लाखो रुपयाच्या वनसंपत्तीची कत्तल करुन मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या अमुल्य वृक्ष संपत्तीचे नुकसान करीत कायद्याचे उल्लंघन करून बेशुमार जिवंत वृक्षांची तोड करण्यात आली असून ,

या संदर्भात तक्रारीचे निवेदन दिल्यावर देखील अद्यापपर्यंत प्रशासनाच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने दिसुन येत असुन, या वृक्षाच्या बेकाद्याशिर कतली मध्ये सहभागी व्यवस्थापकाला कुणाचे तरी राजकीय पाठबळ तर नाही ना असा प्रश्न वृक्षप्रेमी मध्ये उपस्थित करण्यात येत आहे .

मधुकर सहकारी साखर कारखाना येथील व्यवस्थापकावर व त्यांच्या सहकारी मित्रांवर वनकायद्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत असुन , वृक्षांच्या बेकाद्याशीर कत्तलीमुळे तालुक्यातील पर्यावरणप्रेमी व शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे

Previous articleराष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
Next articleसंग्रामपूर तालुक्यातील निवाना येथे किसान सेनेची शाखा स्थापन