राजकीय दुष्टीकोणातुन संपुर्ण तालुक्यात महत्त्वाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले महाविकास आघाडीचे लोकनियुक्त सरपंच रणजित गंगतीरे यांनी नुकताच पदभार स्विकारला.
राष्ट्रवादी चे नेते तथा बुलढाणा जि.प.चे मा.उपाध्यक्ष संगितराव उपाख्य राजु पाटिल भोंगळ यांचे नेतृत्वात व मा.लोकनियुक्त सरपंचा श्रीमती शैलजाताई भोंगळ यांचे उपस्थितीत हा पदभार पार पडल्या.या वेळी संगितराव भोंगळ आणि श्रीमती शैलजाताई भोंगळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सौ नर्मदा गजानन पुंडे, प्रशांत मोतीराम अढाव,सौ गोकर्ना शेगोकार,दिनेश तानाजी वानखडे तसेच महाविकास आघाडीचे अविनाश अकोटकार,शरद तायडे,उकर्डा राऊत,गिऱ्हे गुरूजी,नारायण वानखडे रामदास गंगतिरे, गजानन ढोकणे,मुन्ना बोरखडे, ज्ञानेश्वर वानखडे,रमेश बोदडे,कुर्बान अली,लक्ष्मण कुरवाळे,नंदूभाऊ गुप्ता,अरुण वडे,सुनील तायडे,पप्पू पठाण,हरिभाऊ पुंडे,दिनकर इंगळे,रामेश्वर भड,मोहन सोनोने,भानुदास वाघमारे, मुरलीधर इंगळे,दिगंबर चोपडे, अंबादास उगले,जगन्नाथ धर्माळ,गोपाल चोपडे,दिगंबर वाघमारे,अनंतराव दसोरे, बिस्मिल्ला खान,दादा तायडे,गजानन रहाटे,अमीत पाटील,शरीफ मिस्त्री,मकसुद अली पत्रकार,रकिब मिस्त्री, जलाल खान,प्रकाश बोळे,एजाज भाई,नीलेश गंगतिरे,ईश्वर दिघे,अर्शद पठाण,किशोर शेगोकार, ओंकार वानखडे,सौ राजनंदनी गोपाल नुपणारायान व गावकरी मंडळी बहुसंख्यने उपस्थित होते.
ग्रामिण जनतेने दिलेल्या विश्वास प्रथमस्थानी ठेवुन राजकीय वाटचाल महत्वाचा राहील. मुलभुत व शास्वस्त विकासाला महत्व देत पुढील कार्यकाळ करण्यात येईल असा आशावाद व्यक्त करत गावाचा विकास महत्त्वाचा राहील अशी भुमिका संगितराव भोंगळ यांनी मांडली.
याप्रंसगी माजी लोकनियुक्त सरपंचा श्रीमती शैलजाताई भोंगळ यांचे उपस्थितीत नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच रणजित गंगतीरे यांनी पदभार स्विकारला.
या प्रसंगी मा.लोकनियुक्त सरपंचा श्रीमती शैलजाताई भोंगळ यांनी आरोग्य,शिक्षण,पाणी,रस्ते, स्वच्छ्ता या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करुन विकास घडविला त्या अनुषंगाने या विकासाच्या मुद्यावर अधिक विकास कायम करण्यावर भर दिल्या जाहील अशी आशा श्रीमती भोंगळ यांनी व्यक्त केली. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, पाण्याचे कायमस्वरुपी नियोजन, शिक्षण विभागात अमुलाग्र बदल घडवुन सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेवुन गावाच्या विकासासाठी विविध योजनांवर अधिक भर देण्यात येईल 2017 च्या निवडणुकीत गावकरी मंडळींनी दाखविलेला विश्वास कायम ठेवत 2022 मध्ये ही तो विश्वास कायम राहत विकासाच्या मुद्यावर राजकारण न करता निव्वळ समाजकारण करण्यावर भर दिला जाहील अशी भुमिका राहील.
व त्या स्वरुपाची शिकवण संगितराव भोंगळ यांनी दिली आहे.
नवनिर्वाचित सरपंच रणजित गंगतीरे यांनी जनतेने दाखविलेला विश्वास आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशी ग्वाही दिली.