Home जालना पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांचा माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्याकडून सन्मान

पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांचा माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्याकडून सन्मान

328

 

(तुकाराम राठोड)

जालना-महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाकडून नुकत्याच घोषित झालेल्या(बेस्ट पोलीस युनिट-2021)पुरस्कार हा जालना जिल्हा पोलीस दलास सर्वोत्कृष्ट पोलीस घटक(बेस्ट पोलीस युनिट-2021)म्हणून महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या वतीने घोषित करण्यात आले.ही निवड 25 जिल्हा पोलीस घटकामधून जालना जिल्हा पोलिस दलास सर्वोत्कृष्ट घटक म्हणून घोषित केले.यानिमित्ताने माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांचा सन्मान केला.

सन्मान स्विकारण्या पुर्वी या सन्मानाचे खरे श्रेय अगोदरचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख साहेब यांना जाते.

तेच यासन्मानाचे खरे मानकरी असल्याचे सांगत पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला.यावेळी मानेगाव(जा) येथील सरपंच संतोष ढेंगळे,ग्रा.प.सदस्य श्रीराम पोटरे,गजानन भोकरे आदी उपस्थित होते.

Previous articleलिंग आधारित भेदभाव व हिंसा समाप्त करण्याची बचत गटाच्या महिलांनी घेतली प्रतीज्ञा
Next articleपंतजलि योग परिवार बुलडाणा जिल्हाच्या वतीने  संतनगरी शेगांव मध्ये पत्रकारकार दिन साजरा