Home वर्धा कट रचुन खंडणी उकाळण्याबाबत कलम १०९,१२०(b),३८४,३८५अन्वये गुन्हा दाखल

कट रचुन खंडणी उकाळण्याबाबत कलम १०९,१२०(b),३८४,३८५अन्वये गुन्हा दाखल

469

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा :-दि.७ जानेवारी फिर्यादी पंकज रामदास तडस( वर्धा जिल्हा खासदार ) यांचा मुलगा यांनी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे येवुन रिपोर्ट दिली की, यातील आरोपी मंगेश चोरे रा. वर्धा याने पुजा मुकुंद शेंद्रे रा. वर्धा हिला हाताशी धरुन फिर्यादी कडुन पैसे उकळण्याच्या उददेशाने फिर्यादीशी मैत्री करुन त्यांच्या परिवाराची बदनामी करण्याची धमकी देवुन त्याच्याशी जबरदस्तीने लग्न करुन त्याच्याकडुन १ लाख रुपये उकळुन आणखी आरोपी मंगेश चोरे करिता ५० लाख रुपये तसेच

पुजा मुकुंद शेंद्रे करिता २ करोड रु. व फ्लॅटची मागणी केली असल्याने फिर्यादीने त्याबाबत असमर्थता दर्शविल्याने मंगेश चोरे याने त्याच्या न्युज पोर्टलवर फिर्यादीबाबत बदनामी कारक मजकुर छापण्यास सुरुवात केली तसेच दि.६ जानेवारीला परत फिर्यादीला एका ऑडीओ क्लिपव्दारे पुजा मुकुंद शेंद्रेचा

दुस-या व्यक्तिच्या माध्यमातुन खुन करुन फिर्यादीला त्यात फसविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा फिर्यादीला भय असल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे अपराध क्र. २६/२०२३ कलम १०९,१२०(b),३८४,३८५अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा करित आहे.

Previous articleजगातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका आणि समाज सुधरिका फातिमा शेख यांची 192 वी जयंती साजरी
Next article२५ वर्षे लोटली जमीनीचा मोबदला कधी मिळणार ?