Home वर्धा २५ वर्षे लोटली जमीनीचा मोबदला कधी मिळणार ?

२५ वर्षे लोटली जमीनीचा मोबदला कधी मिळणार ?

157

 

आमदार कुणावार यांना निवेदनाव्दारे अन्यायग्रस्त शेतकर्याचे साकडे

गुडडु कयुरेशी

सिंदी रेल्वे ता.१० : परिसरातील शेतकऱ्यांची निम्न वणा प्रकल्पा अंतर्गत बनविण्यात आलेल्या कालव्याकरिता इ. स. १९९७ मध्ये शेतजमीन अधिग्रहित करण्यात आली. मात्र २५ वर्षे लोटुन सुध्दा अद्याप जमीनीचा मोबदला मिळाला नाही.

शासकीय कार्यालयाचे उंबरठे झीजवून सुद्धा अन्यायग्रस्त शेतकत्यांना न्याय मिळाला नसल्याने या अन्यायग्रस्त शेतकत्यांनी आमदार समीर कुणावार यांनाच सोमवारी( ता.९) निवेदन देऊन साकडे घातले.

……………..सविस्तर वृत असे की निम्न वना प्रकल्पा अंतर्गत बनविण्यात आलेल्या कालव्याकरिता सिंदी, कळमना, मारडा, दिग्रज, विखणी, जसापूर, गौळ, भोसा, कृष्णापुर, सालापूर इत्यादी गावातील शेतकऱ्यांची शेत जमीन २५ वर्षाअगोदर म्हणजे इस. १९९७ ला अधिग्रहित करण्यात आली. मात्र सदर अधिग्रहीत शेत जमीनीचा मोबदला व भुभाडे पट्टी अजून पर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही.
२५ वर्षापासुन समधीत शासकीय कार्यालयाचे उंबरठे झीजवून सुद्धा अन्यायग्रस्त शेतकत्यांना न्याय मिळाला नाही.

आपल्या न्यायीक मागण्यासाठी हे सर्व विविध गावाचे अन्यायग्रस्त शेतकरी एकवटले असुन आम्हा शेतकऱ्यांचा हक्काचा शेत जमिनीचा मोबदला व भुभाडे पट्टी नवीन स्केल प्रमाणे मिळावे व हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा या अनुषंगाने लेखी निवेदन मा. आमदार समिरभाऊ कुणावार यांना सोमवारी (ता.९)देण्यात आले.
निवेदन सादर करताना अन्यायग्रस्त शेतकरी गजानन पाल, सुधाकरराव वाघमारे,राजू दांडेकर, बंटी बेलखोडे, सुनील शेन्डे, गजानन तिमांडे, रामदास मोहिते,वासुदेवराव सोनटक्के, प्रवीण सोनटक्के, नारायण बुरीले, पुरषोत्तमराव महाडुळे,समीर वांदिले, गणेश नौककर,पुरषोत्तमराव पाल,सुभाषराव बलवीर आदी ४० हुन अधिक शेतकर्याची उपस्थिती होती.

एकवटलेल्या शेतकर्याना शासणाने ताबडतोब मोबदला व भाडेपट्टी द्यावी अन्यथा या अन्यायग्रस्त शेतकर्यानी उग्र आंदोलन करण्याचा निर्धार बोलुन दाखविला

Previous articleकट रचुन खंडणी उकाळण्याबाबत कलम १०९,१२०(b),३८४,३८५अन्वये गुन्हा दाखल
Next articleसोयाबीन-कापूस प्रश्नी ना.देवेंद्र फडणवीसांचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयलांना पत्र