इस्माईल शेख शेगाव
दिवाणी व फौजदारी न्यायालय शेगाव येथील बार असोसिएशनचे सदस्य एडवोकेट प्रकाश वाकोडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 09,01, 2023 रोजी शेगाव बार असोसिएशनच्या माध्यमातून तहसीलदार समाधान सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
दिनांक ०७/०१/२०२२ सायंकाळच्या सुमारास कोर्टाचे काम आटोपल्यानंतर एडवोकेट प्रकाश सुखदेव वाकोडे घरी जाण्यास निघाले असता. रोकडिया नगर मधील नालंदा कॉलनी मध्ये काही गाव गुंडांनी त्यांची गाडी अडवून लाकडी रॉडने गाडीवर हल्ला केला. सदर घटनेची माहिती एडवोकेट प्रकाश वाकोडे यांना विचारपूस केली असता.
या गावगुंडांचा उद्देश मला जीवे मारण्याचा होता. अशी फिर्याद पोलिसांकडे त्यांनी दिली.शेगाव वकील संघाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत शेगाव बार असोसिएशनच्या समस्त वकिलांनी शेगाव तहसील कार्यालय तहसीलदार तथा दंडाधिकारी यांना ०९/०१/२०२३ रोजी तीव्र निषेध व्यक्त करीत वकिलास संरक्षणासाठी निवेदन देण्यात आले. व सदर घटनेचा निषेध व्यक्त केला.
तहसीलदार समाधान सोनवणे यांना निवेदन देताना शेगाव बार असोसिएशनचे वकील संघ