Home Breaking News १२ वर्षाच्या युवतीने दिला बाळाला जन्म ,लैंगिक अत्याचार करणारा ही अल्पवयीन ,पोलीस...

१२ वर्षाच्या युवतीने दिला बाळाला जन्म ,लैंगिक अत्याचार करणारा ही अल्पवयीन ,पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

384

 

विकी वानखेडे यावल

यावल; – तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे ज्या वयात मुले मुली खेळण्याचा आनंद घेतात , त्या वयात एका १२ वर्षाच्या मुलीने एका बाळाला जन्म दिला . एका एलवयीन मुलाने हे भीषण कृत्य केले आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे कि यावल तालुक्यात एका १२ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचारातून बाळाला जन्म द्यावा लागला आहे . या घटनेमुळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या घटने बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार १२ वर्षीय मुलगी हि आपल्या आईवडिलांसह राहत होती .

या मुलीचे आईवडील आणि भाऊ हे दोघेही आपले जीवनाच गाडा चालविण्यासाठी हात मजुरीचे काम करीत असत . या मुलीने वर्षभराचे पासून शाळेत जाणे अचानक बंद केले , म्हणून ती घरीच राहत असे , घरी रहात असल्यामुळे त्यांच्याच समाजातील एका अल्पवयीन मुलाने तिला अमिष दाखवत तिच्यावर वर्षभर अत्याचार केला .

आणि या अत्याचारातून ती मुलगी गर्भवती राहिली . तो पर्यंत नातेवाईकांमध्ये गंधामुक्तीचा कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी त्या मुलीचे वागणे बोलण्यावरून काहीतरी फरक जाणविल्याने त्या ठिकाणी मुलगी गर्भवती असल्याचे माहीत पडले .

झालेल्या या घटनेमुळे यामुलीने १३ तारखेला शुक्रवारी दुपारी एका बाळाला जन्म दिला आहे . या घटनेमुळे सर्वांनाच धक्काचा बसला आहे . या सर्व झालेल्या प्रकरणा बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .

Previous articleराष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्काराने विलास रामावत सन्माणित:
Next articleगाडऱ्या येथील बेपत्ता विवाहीत महीलेचे मृत अवस्थेत मिळाले प्रेत खुन झाल्याचे संशय पोलीस व आरोग्य विभाग घटनास्थळी रवाना